तुरीचे भाव घसरले; बाजारात आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:07 PM2019-02-14T22:07:20+5:302019-02-14T22:07:51+5:30

विदर्भाच्या विविध भागात कपाशीसोबत आंतर पीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. यंदा कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत तुरीला चांगला भाव राहिल, अशा आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे.

Price slips; The market increased inward | तुरीचे भाव घसरले; बाजारात आवक वाढली

तुरीचे भाव घसरले; बाजारात आवक वाढली

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नातही घट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भाच्या विविध भागात कपाशीसोबत आंतर पीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. यंदा कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत तुरीला चांगला भाव राहिल, अशा आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे. तुरीचे भाव घसरल्याने सेलू, हिंगणघाट, वर्धा आदी बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे. सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तुरीला ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रूपये भाव देण्यात आला. बाजार समितीत एकदम आवक वाढल्याने भाव मंदावले आहे. अशी स्थितीतही शेतकरी आपला शेतमाल विकण्यावर भर देत आहे. हिंगणघाटही कापूस व तुरीची मोठी बाजारपेठ असून हिंगणघाटच्या बाजारपेठेत बुधवारी तुरीला ५ हजार २०१ रूपये भाव देण्यात आला.
वर्धा जिल्ह्यात काही भागात शेतकरी तुरीची सलग लागवड करतात. त्यामुळे त्यांना उत्पन्नाची आशा होती. मात्र यावर्षी उत्पादन घटल्याने अनेकांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. राज्यसरकारने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यासाठी फार व्यवस्था केलेली नाही. याच्या नोंदणीला मुदतवाढ दिली असली तरी अनेक शेतकरी थेट बाजारपेठेतच तूर विक्रीसाठी आणून व्यापाऱ्यांना ती देत आहेत. काही शेतकºयांना नगदी चुकारे मिळाले असून काही शेतकºयांनी तूर बाजार समितीच्या तारण योजनेत ठेवलेली आहे. शेतमाल साठवणूकीसाठी सर्व शेतकºयांकडे व्यवस्था नसल्याने कापूस, तूर, सोयाबीन या शेतमालाची तात्काळ विक्री करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे व्यापारी देईल तो भाव अशी अवस्था शेतकºयांची झाली आहे. बाजारात आवक वाढल्याने भाव पडले आहेत. कापसाची ही अशीच अवस्था झाली आहे.

Web Title: Price slips; The market increased inward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.