आर्वी तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:26 PM2019-07-25T22:26:55+5:302019-07-25T22:27:37+5:30

मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे.

The problem of double sowing on Arvi taluka? | आर्वी तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट?

आर्वी तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट?

Next
ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : शेतकरी चिंतित, जोरदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे दिसून येत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात पहिल्यांदाच पावसाचे आगमन जुलै महिन्यात उशिराने झाले. पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने मागील आठवड्यात तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी केली आणि पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहे.
सोयाबीन पिकाला जुलै महिन्यात पेरणीनंतर सतत पावसाची गरज पडते. त्यातही हवामान खात्याने जुलै महिन्यात पावसाचा खंड असल्याचे सांगितल्याने शेतकरी धास्तावले होते. कपाशी व तूर उत्पादकांना पावसाची प्रतीक्षा आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांचे समाधान होईल इतकाही पाऊस झाला नाही. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी जुलै महिन्यात पेरणी केली; परंतु जुलै महिना हा खरा पावसाचा असूनही म्हणावे तसेच सातत्य आढळून आले नाही. जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाचा पत्ता नाही. तालुक्यात वाढोणा, देऊरवाडा, वागदा, अहिरवाडा, नांदपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, एकलारा, नांदपूर, शिरपूर, जळगाव, खुबगाव, पाचेगाव, दहेगाव, वर्धमनेरी, मांडला, रोहणा, पिंपळखुटा, चिंचोली, गुमगाव, नेरी, सावळापूर आदी गावातील शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी पेरणीनंतर तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने सिंचनाची सुविधा असणाºया शेतकºयांनी आपल्या शेतपिकाला जगविण्यासाठी सिंचन करणे सुरू केले होते. ज्या शेतकºयाकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांना वरूणराजा बरसण्याची प्रतीक्षा कायम होती.
सर्वत्र शेतकºयाकडून वरूणराजा लवकर बरसावा यासाठी प्रार्थना सुरू होती. अखेर वरूणराजाचे तालुक्यात आगमन झाल्याने काही दिवसासाठी पीक वाढीसाठी दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यात शेतपिकांना पाहिजे तेव्हाच व मोजकाच पाऊस पडत असल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची, धरणाची, नदी-नाल्याची अवस्था बिकट असून दमदार पावसासह पावसाच्या झडीची आता तालुक्यातील शेतकºयांना प्रतीक्षा आहे.

मागील तेरा दिवसांपासून आर्वी तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे पिकांची अवस्था वाईट आहे. जुलै अखेरच्या टप्प्यात असतानाही जोरदार पाऊस नाही. परिणामी, पिकांची वाढ खुंटलेली असून झडीची प्रतीक्षा आहे.
- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता. आर्वी.

Web Title: The problem of double sowing on Arvi taluka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.