खरेदी झाली तरी लॉग एन्ट्रीची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:20 PM2018-05-15T22:20:14+5:302018-05-15T22:20:14+5:30
शासनाच्यावतीने तूर खरेदीला दिलेली मुदतवाढ मंगळवारी संपली आहे. शासकीय तूर खरेदीचा आज अंतिम दिवस असल्याने शेतकऱ्यांची शासकीय केंद्रांवर चांगलीच झुंबड उडाली होती. शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने खरेदी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकाºयांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्यावतीने तूर खरेदीला दिलेली मुदतवाढ मंगळवारी संपली आहे. शासकीय तूर खरेदीचा आज अंतिम दिवस असल्याने शेतकऱ्यांची शासकीय केंद्रांवर चांगलीच झुंबड उडाली होती. शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने खरेदी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकाºयांनी दिली. रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू राहणार असल्याने तुरीची लॉग एन्ट्री होणे अवघड आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
गोदामाचे कारण काढून शासनाने १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केली होती. मात्र शासनाच्या निकषानुसार अनेक शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंद करून ठेवल्याने त्यांची तूर घरीच पडून राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. या संदर्भात शासनावर सर्वच बाजुने दबाव आल्याने त्यांच्याकडून तूर खरेदीची बंदी उठवून मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ मंगळवार (दि.१५) पर्यंत होती. या मुदतीत आॅनलाईन नोंद असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याच्या सूचना आल्याने त्यांच्या तूर खरेदीला प्राधान्य देण्यात आले होते. वर्धेत शासनाने दिलेल्या निकषानुसार खरेदी झाल्याचे मार्केटींग अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
शासकीय खरेदीचा आज अंमित दिवस असल्याने जिल्ह्यात असलेल्या सातही केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती. आॅनलाईन नोंद असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची तूर थेट बाजारात आल्याने तिच्या खरेदीची जबाबदारी खरेदी यंत्रणेवर आली. यामुळे रात्री उशिरापर्यंत खरेदी होती; पण त्यांची संगणकावर लॉग एन्ट्री करण्याची समस्या निर्माण झाली. संकेतस्थळ रात्री १२ वाजता बंद होणार असल्याने काय करावे, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे.
नोंदणीकरिता कागदपत्र देणाऱ्या ४,८८६ शेतकऱ्यांची गोचीच
शासनाची तूर खरेदी बंद झाली त्या काळापर्यंत आॅनलाईन नोंद करणाºया शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्या होत्या. मात्र याच काळात आॅनलाईलन नोंद करण्याकरिता केंद्रावर कागदपत्र देवून असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे. वर्धेत आॅनलाईन नोंद असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली; पण आॅनलाईनच्या नोंदीकरिता कागदपत्र देणाऱ्या तब्बल ४,८८६ शेतकऱ्यांच्या तुरीला शासकीय दर मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसर झाली आहे.
शासकीय तूर खरेदीचा आज अंतिम दिवस असल्याने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर गर्दी केली. यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यांची तूर खरेदी करण्याच्या सूचना केल्या. शेतकऱ्यांची तूर खरेदी झाल्यानंतर त्याची लॉग एन्ट्री करणे अनिवार्य आहे. मात्र आज रात्री १२ वाजता शासनाने संकेतस्थळ बंद होणार असल्याने त्याची अडचण होणार आहे. या संदर्भात शासनाने मुदतवाढ देण्याची मागणी आहे.
-व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी.