मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण
By Admin | Published: April 16, 2017 12:56 AM2017-04-16T00:56:14+5:302017-04-16T00:56:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोठे स्पिकर लावून ...
१२ जणांवर गुन्हे
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोठे स्पिकर लावून ध्वनी पदूषण करणाऱ्या दोन मिरवणुकीवर कारवाई करण्यात आली. यात एकूण १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, १४ एप्रिलच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान आर्वी नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत ट्रॅक्टर क्र. एम.एच ३२ पी १६५१ व ट्रॉली क्र. एम.एच. २९ सी ५६८२ मध्ये ध्वनीप्रदूषण यंत्रणा एकूण ६ स्पीकर बसविले. ध्वनी प्रदूषण तपासणी प्रक्षेपणाद्वारे ध्वनी तीव्रता मोजली असता ती १०८ डेसीबल इतकी आढळून आली. यावरून मिरवणुकीचे आयोजक विशाल भोयर, शैलेश थुल, राजेंद्र कातकर, मनोहर कांबळे, रवींद्र बावनकर, अमोल चाहांन्दे सर्व रा. नागसेन नगर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. शास्त्री चौक परिसरात रॅली दरम्यान मिनीट्रक क्र. एम.एच. ०५ ४०४४ मध्ये ध्वनीप्रदूषण यंत्रणा एकूण ६ स्पीकर बसूवन १००.७ डेसीबल इतक्या तीव्र आवाजात गाणे वाजविल्याचे आढळून आले. यावरून अमित नाईक, अक्षय बागडे, साहील डोके, अक्षय सुटे, निलेश फुसाटे सर्व रा. सिंदी (मेघे) या पाच जणांसह अभिलाष संजय पवार रा. नागपूर याच्यावर रामनगर ठाण्यात भादंविच्या कलम ३३, १३४, १३६, सहकलम ३१ (अ), ३७ हवा प्रदूषण प्रतीबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)