टाकाऊ ट्यूबमधून कुंड्यांची निर्मिती; वर्ध्यातील जाबीर शेख यांची कल्पकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:01 PM2019-07-13T13:01:29+5:302019-07-13T13:01:51+5:30

बहुतांशवेळी एखादा सामान्य माणूस आपल्या अभिनव कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातो. याच घटनेची प्रचिती कारंजा घाटगे येथील बसस्थानकावर पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या जाबीर शेख नामक व्यावसायिकाने आपल्या कलाकृतीतून आणून दिली.

Production of tree pots Waste Tub; Jabir Shaikh's idea in Wardha | टाकाऊ ट्यूबमधून कुंड्यांची निर्मिती; वर्ध्यातील जाबीर शेख यांची कल्पकता

टाकाऊ ट्यूबमधून कुंड्यांची निर्मिती; वर्ध्यातील जाबीर शेख यांची कल्पकता

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छ अभियानालाही हातभार

अरूण फाळके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बहुतांशवेळी एखादा सामान्य माणूस आपल्या अभिनव कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातो. याच घटनेची प्रचिती कारंजा घाटगे येथील बसस्थानकावर पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या जाबीर शेख नामक व्यावसायिकाने आपल्या कलाकृतीतून आणून दिली. टायरच्या टाकाऊ तुकड्यांपासून कुंड्यांची निर्मिती करीत स्वच्छतेलाही हातभार लावला.
३५ वर्षीय जाबीर शेख यांचा पंक्चर दुरुस्तीचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचे बसस्थानक परिसरात सर्व्हिस मार्गालगत पंक्चर दुरुस्तीचे दुकान आहे. पंक्चर ट्यूब दुरुस्ती करताना सुरक्षितता म्हणून ट्यूबभोवती टायरचे तुकडे टाकावे लागतात. खराब झालेले टायर बाहेर फेकून द्यावे लागतात. त्यामुळे दुकानाचे सभोवताल घाण पसरून अस्वच्छता निर्माण होते. जाबीर शेखने आपल्या कल्पकतेतून या टाकाऊ टायरला कापून सुंदर आकाराच्या कुंड्या तयार केल्यात. त्या कुंड्यांमध्ये पाणी व मातीचा वापर करून झाडे लावलीत. या टायरच्या कुंड्यांना रंगरंगोटी करून आकर्षक बनविल्या आणि त्या कुंड्यांच्या बाजूला स्वच्छ भारत अभियानचा फलक लावून ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावीपणे जाहिरात करून राष्ट्रीय कार्याला सक्रियपणे हातभार लावत आहे. जाबीर शेखच्या या कल्पकतेचे कौतुक केले जात आहे.

Web Title: Production of tree pots Waste Tub; Jabir Shaikh's idea in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.