टोमॅटोचे मोफत वाटप करुन शेतक-याचा सरकारविरोधात निषेध
By Admin | Published: December 27, 2016 03:44 PM2016-12-27T15:44:19+5:302016-12-27T15:44:19+5:30
योग्य भाव मिळत नसल्याने एका शेतक-याने बजाज चौकात त्याची चक्क फुकटात विक्री केली
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 27 - बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वर्धामध्ये तर एका शेतक-याने टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने बजाज चौकात त्याची चक्क फुकटात विक्री केली. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणाचाही कडाडून विरोध केला.
प्रमोद रणीत असे शेतक-याचे नाव असून ते चिकणी येथील रहिवासी आहेत. टोमॅटोचे मोफत वाटप सुरू केल्यानंतर नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. 'माझे नुकसान झाले आहे, सर्वसामान्यांना काहीतरी लाभ व्हावा म्हणून मोफत टोमॅटो वाटत आहे', अशी प्रतिक्रिया यावेळी प्रमोद यांनी दिली. शेतमालाला भाजीबाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी शेतमाल शेतातच फेकत आहे.