काळ्या फिती लावून शासकीय धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:57 PM2018-09-25T23:57:24+5:302018-09-25T23:57:56+5:30

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांसाठी अन्याय कारक असून तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्त्वात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला.

The prohibition of government policies by using black racks | काळ्या फिती लावून शासकीय धोरणांचा निषेध

काळ्या फिती लावून शासकीय धोरणांचा निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षकांचे आंदोलन : ‘तो’ निर्णय मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय शिक्षकांसाठी अन्याय कारक असून तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्त्वात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला.
कमी पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील प्राथमिक शाळा बंद करण्याच्या कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. हा प्रकार शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे. कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा ग्रामीण, दुर्गम भागातील बालकांना शिक्षण प्रवाहापासून दूर करण्याचा प्रकार आहे. या निर्णयामुळे गरीब व समाजातील दुर्बल घटक असलेल्या कुटुंबियांच्या मुलांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी सदर आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे विजय कोंबे, महेंद्र भुते, नरेंद्र गाडेकर, रामदास खेकारे, अजय काकडे, मनोहर डाखोळे, गुणवंत बारहाते, प्रशांत निंभोरकर यांनी केले. आंदोलनात यशवंत कुकडे, प्रकाश तिखे, सुदेश खोब्रागडे, अजय बोबडे, संदीप अतकरणे, सुरेश ढोले, सतीश घोडे, श्रीकांत अहेरराव, मनीष ठाकरे, गजानन फटिंग, प्रशांत ढवळे, अशोक डोंगरे, नितीन डाबरे, शिवणकर, भोयर, तपासे, बाळसराफ यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते.

Web Title: The prohibition of government policies by using black racks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक