पुरोगामी संघटनांकडून कोपर्डी प्रकरणाचा निषेध
By Admin | Published: July 21, 2016 12:38 AM2016-07-21T00:38:38+5:302016-07-21T01:14:25+5:30
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर भयंकर अत्याचार तिचा खून करण्यात आला.
बीड : येथील अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्याचा तपास मुंबई सीआयडीमार्फत सुरु आहे. जवळपास सहा महिन्यापूर्वी या तपासाला सुरुवात झाली असून अद्यापही माहितीचे संकलन सीआयडीमार्फत केले जात आहे. बीड साठे महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांना मुंबई येथे जुन्या कर्ज वाटपाच्या माहितीसाठी बोलाविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अण्णभाऊ साठे विकास महामंडळात घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर कर्ज वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानंतर बीड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मुंबई सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी बीडच्या कार्यालयातील कॅशबुक रजिस्टर जप्त करण्यात आले होते. वेळोवेळी सीआयडी अधिकारी घोटाळ्याबाबतची चौकशी करत आहेत. घोटाळ्यात गुंतलेल्यांच्या मागे अधिकाऱ्यांचा ससेमिरा सुरुच आहे. त्यामुळे घोटाळेबाजांची पाचावर धारण बसली आहे.
बीड येथील कार्यालयातील एकमेव असलेले कॅशबुक रजिस्टर जप्त केल्यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी माहिती मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे एक कर्मचारी मुंबई येथे जप्त केलेल्या कॅशबुक रजिस्टरची नक्कल काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, जुनी कर्ज प्रकरणे व घोटाळ्याबाबतची माहिती घेण्यासाठी बीड साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी.के.साठे व अन्य एक कर्मचारी मुंबईला रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)