दिव्यांगावर झालेल्या लाठीचार्जचा प्रहारकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:25 AM2019-02-28T00:25:40+5:302019-02-28T00:26:48+5:30
पुणे येथील आयुक्त कार्यालयात दिव्यांग बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याचा निषेध नोंदवत दोषींवर आर.पी.डब्लू.डी.अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रहार संघटनेच्यावतीने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुणे येथील आयुक्त कार्यालयात दिव्यांग बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याचा निषेध नोंदवत दोषींवर आर.पी.डब्लू.डी.अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रहार संघटनेच्यावतीने केली आहे. या मागणीचे अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
कर्णबधीर दिव्यांगावर पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालयात बाहेर लाठीचार्ज करण्याचा अधिकार कुणी दिला. ज्या मुलांना काही बोलता व ऐकता येत नाही, अशा निष्पाप तरुणांवर लाठीचार्ज करुन या सरकारला व प्रशासनाने काय साध्य केले, असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे. कर्णबधीर मुलांना सांकेतिक भाषेत समजावून सांगणे, हे पोलिसांचे कर्तव्य होते. पण, पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले नाही. त्यामुळे दोषींवर आर.पी.डब्ल्यू.डी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा.
या कर्णबधीर दिव्यांगाना बोलता व ऐकता येत नाही, हे माहिती असुनही पोलिसांना लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? दिव्यांगाना नोकरी आणि शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकारच आहे, अशा आशयाचे निवेदन अपर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले.
निवेदन देताना प्रहारचे वर्धा शहर प्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात शुभम भोयर, नितेश चातुरकर, भुषण येलेकार, दादा बोरकर, नितीन काटकर, शैलेश कोसे, वैभव शेंडे, हरिष डोंगरे, सचिन कोळसे, आदित्य कोकडवार, प्रशिल धांदे, पवन दंदे, श्याम शेलार, विक्रम येलेकार यांच्यासह प्रहार संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.