जिल्ह्यात सहा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’चा प्रस्ताव

By admin | Published: March 21, 2017 01:17 AM2017-03-21T01:17:35+5:302017-03-21T01:17:35+5:30

जिल्ह्याचे वनक्षेत्र ९६ हजार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. या वनपरिक्षेत्रात असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘बायोडायव्हर्सिटी पार्कची’ निर्मिती करण्यात येणार आहे.

Proposal of six 'Biodiversity Park' in the district | जिल्ह्यात सहा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’चा प्रस्ताव

जिल्ह्यात सहा ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’चा प्रस्ताव

Next

जागतिक वन दिन : वनसंपदेचे जतन करण्याकरिता वनविभाग सज्ज
श्रेया केने वर्धा
जिल्ह्याचे वनक्षेत्र ९६ हजार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. या वनपरिक्षेत्रात असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘बायोडायव्हर्सिटी पार्कची’ निर्मिती करण्यात येणार आहे. सेलूकाटे, पवनार, बोरधरण, सारंगपूरी, गुंजखेडा आणि ढगा येथे या पार्कचे काम प्रस्तावित केले असून यामुळे वनसंपदेत भर पडणार असल्याची माहिती आहे.
जागतिक वन दिनानिमित्त जिल्ह्यात अनेक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. प्रामुख्याने शाळा महाविद्यालयात हरित सेनेच्या समन्वयातून उपक्रम राबविले जातात. वनसंवर्धन आणि संरक्षण ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असून या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. वनविभागाकडून वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जंगलव्याप्त भागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जंगल परिसरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ तेथील रहिवाशांना मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहे. विविध प्रशिक्षण देऊन तेथील रहिवाशांना रोजगार देण्यात येत आहे. शिवाय जंगलव्याप्त भागात औषधीयुक्त झाडांची लागवड करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात ‘फायर अलर्ट सिस्टिम’ कार्यान्वित
उन्हाळ्यात जंगलांना आग लागण्याचे प्रमाण वाढते. या घटनांना आळा घालण्यासाठी आणि वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी एफएसआय अंतर्गत ‘फायर अलर्ट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जंगलातील ज्या भागात आग लागली असेल तिचे नेमके स्थळ कळण्यास मदत होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे सहजशक्य होते. याकरिता वनकर्मचाऱ्यांना अ‍ॅण्ड्राईड प्रणालीचे स्मार्टफोन देण्यात आले आहे. या फोनवर अलर्ट देऊन आग विझविण्याचा संदेश दिल्या जातो.

औषधीयुक्त वनस्पतींच्या लागवडीवर भर
५० कोटी वृक्ष लागवडीचे शासनाचे ध्येय आहे. ही उद्दष्टिपूर्ती करताना औषधीयुक्त वनस्पतींची लागवड करण्याच्या सुचना आहे. वर्धा जिल्ह्यात २० ते ३० टक्के औषधीयुक्त वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे. यामुळे येथील वनसंपदा अधिक समृद्ध होईल, असा विश्वास संंबंधीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करताना बांबू लागवडीवर अधिक भर देण्यात आली आहे. ४० वर्षानंतर बांबूच्या झाडाला फुले आले असून यातून तयार बीजांचे संकलन करण्यात आले. याचे वितरण करुन मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यात येईल. ‘बांबू आर्ट’ मुळे रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. एमगिरीच्या माध्यमातून जंगल व्याप्त भागातील रहिवाशांना प्रशिक्षण दिले जात आहे.

जंगलाचे आगीपासून संरक्षण झाले तर जंगलाचे बरेच नुकसान टाळता येईल. वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन ‘ग्रीन आर्मी’ मध्ये नागरिकांनी नोंदणी करुन वृक्ष लागवड चळवळ सक्रीय केल्यास जिल्ह्यातील वनसंपदा नक्कीच समृद्ध होईल.
- डी. एस. पगार, उपवनसंरक्षक, वर्धा

Web Title: Proposal of six 'Biodiversity Park' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.