मे महिन्यात ‘समृद्धी’चा श्रीगणेशा; नागपूर-शिर्डी करता येणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 05:00 AM2022-03-28T05:00:00+5:302022-03-28T05:00:18+5:30

समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

Prosperity begins in May; Travel from Nagpur to Shirdi | मे महिन्यात ‘समृद्धी’चा श्रीगणेशा; नागपूर-शिर्डी करता येणार प्रवास

मे महिन्यात ‘समृद्धी’चा श्रीगणेशा; नागपूर-शिर्डी करता येणार प्रवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगधंद्यांना चालणा मिळणार असून,या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरच कमी वेळेत मुंबई गाठता येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग तसेच पुलगाव जवळ वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची पाहणी ना. शिंदे यांनी रविवारी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य अभियंता सुधाकर मुरादे,अधीक्षक अभियंता अश्विनी घुगे,कार्यकारी अभियंता हेमंत जगताप,भूषण मालखंडारे, उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक,तहसीलदार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर
-    समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजेचे असून प्राण्यांसाठी रस्त्यावर खास उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांमुळे प्राण्यांना जंगलांचा अनुभव येतील, अशी व्यवस्था या पुलांवर करण्यात आली असल्याचे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रिक कार चालवून प्रदूषणमुक्तीचा संदेश
-    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करताना स्वत: इलेक्ट्रिक कार या महामार्गावर चालवून पूर्णत्त्वास गेलेल्या कामांची पाहणी करीत प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला.

शेतमाल वाहतुकीसाठी महामार्ग फायद्याचाच
-    समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन मे महिन्यात करण्याचे प्रस्तावित आहे. या महामार्गामुळे केवळ सहा ते सात तासांत मुंबई पोहोचता येईल. यामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. वाहन जेथे महामार्गावरून बाहेर पडेल तेथेच टोल लागतील. विदर्भातील उद्योग वाढीसह शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचे ना. शिंदे म्हणाले.

जिल्ह्यात ५८ किमीचा महामार्ग पूर्ण

-    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी ५८ कि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील मार्ग पूर्णपणे बांधून झाला आहे. रस्त्याची रुंदी १२० मीटर असून तो सहा पदरी आहे. 
-    वर्धा,सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून एकून ७८२ हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मार्गावर २ हजार ७६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मार्गावर विना अडथळा वाहतूक होण्यासाठी ५ मोठे, २७ लहान पुलांसह ९ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. 
-    येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी दोन विशेष उड्डाणपुले बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title: Prosperity begins in May; Travel from Nagpur to Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.