गावाची समृद्धी ग्रामविकासाचा कळस तर ‘पाणी' म्हणजे पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:22 PM2018-12-27T22:22:21+5:302018-12-27T22:25:36+5:30
ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : ग्रामविकासाचा कळस म्हणजे गावाची समृद्धी आहे परंतु ग्रामविकासाचा पाया पाणी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप - २०१९ करीता पंचायत समिती आर्वी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समिती आर्वीचे उपसभापती प्रा. धर्र्मेंद्र राऊत, विभागीय कृषी अधिकारी सांगाळे , उपविभागीय अधिकारी संदेश ससाणे , गटविकास अधिकारी मडावी, तहसिलदार विजय पवार यांच्या सह पाणी फाऊंडेशनचे समन्वयक व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव उपस्थितीत होते.
पाणी फाऊंडेशनच्यावतीने पंचायत समिती आर्वी येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घघाटन सुमित वानखेडे यांनी केले. प्रदर्शनीत दुष्काळाची विदारकता ते दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली जात आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनीचा लाभ घेत आपला परीसर जल समृद्ध करावा असे आवाहन भुषन कडू यांनी केले आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुमित वानखेडे म्हणाले की, गावाची समृद्धी ही पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असून पाणी फाऊंडेशन गावे जल समृद्ध करण्यासाठी एक निमित्त आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तांत्रिक बाबीवर काम केल्यास गावांची पाणी समस्या दुर होऊन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. गेल्या दोन वर्षांत जलसंधारणाची कामे झालेल्या गावात परिणाम दिसत आहेत. गावे जल समृद्ध होत आहे. आतापर्यंत दोन वर्षांत काम करणाºया गावांना कुठल्याही बाबींची कमतरता भासू दिली नाही आणि यावर्षी देखील सर्वतोपरी मदत शासन, संस्था व्दारे करण्यात येईल. यावर्षी परत पहीले बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करूया. तरूणांनी जलसंधारणाच्या चळवळींमध्ये सक्रियतेने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बॉक्स
शेतकरी कंपनी स्थापन करा
शाश्वत विकास करायचा असेल तर सर्व गावकºयांनी एकत्र येऊन शाश्वत विकास साध्य करता येईल. पाणी उपलब्ध असल्यास शेतीतून चांगले पिक घेता येते. उत्पन्न वाढीसाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून स्वत: ची कंपनी स्थापन करून शेतमालाची विक्री बाहेरील उद्योग समुहास थेट करता येईल. आखाती व इतर देशात जैविक उत्पादनाला प्रचंड मागणी आहे, असे वानखेडे म्हणाले.