हल्लेखोरांपासून डॉक्टरांना सुरक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 09:39 PM2019-06-14T21:39:38+5:302019-06-14T21:40:05+5:30
देशभरात सर्वत्र रुग्णालय किंवा डॉक्टरांवर असामाजिक तत्त्वांकडून भ्याड हल्ले केले जात आहे. यामुळे रुग्णालयाचे नुकसान होते तसेच डॉक्टरांवरही आर्थिक व मानसिक दडपण येत असल्याने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याकरिता काठोर कायदा तयार करुन झिरो टॉलरन्स पॉलिसी तयार करावी आणि सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशभरात सर्वत्र रुग्णालय किंवा डॉक्टरांवर असामाजिक तत्त्वांकडून भ्याड हल्ले केले जात आहे. यामुळे रुग्णालयाचे नुकसान होते तसेच डॉक्टरांवरही आर्थिक व मानसिक दडपण येत असल्याने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याकरिता काठोर कायदा तयार करुन झिरो टॉलरन्स पॉलिसी तयार करावी आणि सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी आज निषेध दिन पाळून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये तरुण डॉक्टरवर हल्ला करुन गंभीर मारहाण करण्यात आली. डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा वातावरणात रुग्णांवर, विशेषत: गंभीर रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर मंडळी नेहमीच दडपणात असतात. याचा परिणाम रुग्णसेवेवर व एकंदरीत सामाजिक आरोग्यावर पडत आहे. त्यामुळे केंंद्र शासनाने अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी कठोर कायदा करावा. झिरो टॉलरंन्स पॉलिसी आणून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. हॉस्पिटल व नर्सिंग होम हे विशेष विभाग म्हणून घोषित करावे व सरकारने परिणामकारक सुरक्षा द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आज निषेध दिन पाळून हाता काळी पट्टीबांधून काम केले. निवेदन देताना आयएमएचे अध्यक्ष
डॉ. संजय मोगरे, उपाध्यक्ष डॉ. जयंत मकरंदे, सचिव डॉ. विपीन राऊत, डॉ. डी. बी. पुनसे, डॉ. रेखा रायझादा, डॉ. शंतनू भोयर, डॉ. रजेंद्र डागा, डॉ. प्रदीप सुने, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. विवेक चकोले, डॉ.अभिजीत खनके, डॉ. संजय घाटे, डॉ. शिरिष वैद्य, डॉ. सचिन पावडे, डॉ. सचिन तोटे, डॉ.अशोक जैन, डॉ. सुहास जाजू, डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. अदलखिया यांच्यासह आयएमएचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.