मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; शिवसेनेचे आंदोलन
By चैतन्य जोशी | Published: September 2, 2023 05:05 PM2023-09-02T17:05:48+5:302023-09-02T17:06:19+5:30
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ शनिवारी १२ वाजता जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ, रूपेश कांबळे यांच्या सूचनेनुसार कारंजा चौकात आंदोलन करण्यात आले.
- चैतन्य जोशी
हिंगणघाट - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ शनिवारी १२ वाजता जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ, रूपेश कांबळे यांच्या सूचनेनुसार कारंजा चौकात आंदोलन करण्यात आले.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्टपासून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते. उपोषणाच्या कालावधीत त्यांचे आरोग्य बिघडल्याचे दाखवून प्रशासनाने उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाने त्यानिमित्त धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यांच्या आंदोलनाला सरकारने पिटाळून लावण्यासाठी सरकारने लाठीचार्ज करून मराठा समाजातील आंदोलनाला हिंसक वळण देत लाठ्या काठ्यांनी मारून आंदोलकांना जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, अभिनंदन मुनोत यांच्या नेतृत्वात कारंजा चौकात राज्य सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रकाश अनासाणे, मनीष देवडे, मनोज वरघणे, भास्कर ठवरे, शंकर मोहम्मारे, श्रीधर कोटकर, मनोज मिसाळ, गजानन काटवले, सुनील आष्टीकर, प्रकाश घोडे, संजय पिंपळकर, रूपेश काटकर, मोहन तुमराम, लक्ष्मण बकाने, अनंता गलांडे, दिनेश धोबे, सचिन मुळे, नितीन वैद्य, प्रशांत आवारी, आशिष भांडे, विनोद मोहोड, गजानन ठाकरे, गोवर्धन शाहू, सुरेश चौधरी, दिलीप चौधरी, गोलू चव्हाण, लक्ष्मीकांत भगत, भास्कर भिसे, हिरामण आवारे, बलराज डेकाटे, रंजीत राहाटे, योगेश कांमडी, प्रशांत कांबळे, अनुराग काशीनिवास, आशिष जयस्वाल, संतोष चौधरी आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.