हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यावरील भ्याड हल्ल्याचा नाेंदविला निषेध

By महेश सायखेडे | Updated: April 3, 2023 17:34 IST2023-04-03T17:32:43+5:302023-04-03T17:34:01+5:30

विविध संघटनांनी मोर्चा काढून सादर केले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Protest against the cowardly attack on a student in Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwa Vidyalaya Wardha | हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यावरील भ्याड हल्ल्याचा नाेंदविला निषेध

हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यावरील भ्याड हल्ल्याचा नाेंदविला निषेध

वर्धा : महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयातील पीएच. डी. विद्यार्थी रजनीश आंबेडकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध सोमवारी विविध संघटनांनी मोर्चा काढून नोंदविला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यावर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

शोधप्रबंध विद्यार्थी रजनीश आंबेडकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करून अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मोर्चात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रशेखर मडावी, माजी नगराध्यक्ष नीरज गुजर, भारतीय बौद्ध महासभेचे विशाल मानकर, वंचित बहुजन आघाडीचे किशोर खैरकार, रिपाइंचे महेंद्र मुनेश्वर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Protest against the cowardly attack on a student in Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwa Vidyalaya Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.