नाथजोगींच्या हत्येचा नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:38 PM2018-07-03T23:38:22+5:302018-07-03T23:40:15+5:30

धुळे जिल्ह्यात नाथजोगी भिक्षुकी भटक्या जमातीमधील पाच जणांची हत्या करणाºयांविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धा जिल्हा भटक्या जमाती संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व या हत्यांचा निषेध करण्यात आला.

The protest of the killings of the inhuman victims | नाथजोगींच्या हत्येचा नोंदविला निषेध

नाथजोगींच्या हत्येचा नोंदविला निषेध

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन : वर्धेत केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धुळे जिल्ह्यात नाथजोगी भिक्षुकी भटक्या जमातीमधील पाच जणांची हत्या करणाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धा जिल्हा भटक्या जमाती संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व या हत्यांचा निषेध करण्यात आला. अशा घटना रोखण्यासाठी शासनाने पावले उचलावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व रविंद्र चव्हाण, सुंदरलाल शिंदे, रामनाथ जगताप, अमर गुंदी, नारायण लकस, सुर्यभान जगताप यांनी केले. आंदोलनानंतर शासनाला पाठविलेल्या निवेदनात भटक्या जमाती संघाने म्हटले आहे की, भारतात मोठ्या प्रमाणावर नाथपंथी समाज आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय भिक्षुकी, ज्योतिष्य आणि जटीबुटी विकण्याचा आहे. यातून ते आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. यासाठी राज्यात व देशात विविध ठिकाणी भटकंती करतात. १ जुलैला धुळे जिल्ह्यात राईनपाडा येथे नाथजोगी समाजातील पाच जणांना टोळी समजून जबर मारहाण करण्यात आली. यात दादाराव भोसले, भारत भोसले, राजु भोसले, भारत माळवे, आगनू भोसले रा. मानेवाडी, जि. सोलापूर यांचा मृत्यू झाला. नागपूर कळमना मार्केट परिसरातही तीन जणांची हत्या करण्यात आली. नाथजोगी समाजातील निरपराध नागरिकांना लक्ष करण्यात येत आहे. पाच जणांची हत्या करणाºयावर तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. मृतकांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाख रूपयाची मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: The protest of the killings of the inhuman victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून