कृष्णा किरवले यांच्या हत्येचा निषेध
By admin | Published: March 6, 2017 01:00 AM2017-03-06T01:00:33+5:302017-03-06T01:00:33+5:30
महाराष्ट्र अंनिस व समविचारी संघटनांच्यावतीने आंबेडकरी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने
वर्धा : महाराष्ट्र अंनिस व समविचारी संघटनांच्यावतीने आंबेडकरी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला करूणा शंभरकर व भंते अभयबोधी यांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. त्यानंतर दिल्ली येथे गुरूमेहर कौर हिने घेतलेल्या भूमिकेबद्दल गृहराज्यमंत्री किरण रिजेजू व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी जे वक्तव्य केले त्याचा व किरवलेंच्या हत्येचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार सामान्य प्रशासन एम.जे. उईके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून कोणत्याही विचारवंताची अशाप्रकारे हत्या होवू नये याबाबत शासनाने तपास यंत्रणेला सूचना द्याव्यात व दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सिद्धार्थ बुटले, संपर्कप्रमुख गजेंद्र सुरकार, प्रजासत्ताकचे अध्यक्ष अरूण हर्षबोधी, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटनेच्या शारदा झामरे, साहेबांचे साहेब संघटनेचे संदीप भगत, विद्रोही कार्यकर्ता विल्सन मोखाडे, अपंग संस्थेचे नरेंद्र कांबळे, किशोर ढाले, नागोराव शंभरकर यांची उपस्थिती होती. संचालन तालुका कार्यवाह सुनील ढाले, प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे तर आभार प्रा. अजय सावरकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता किशोर ढाले, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, भीमसेन गोटे, नारायण आमटे, मनोज कांबळे, दीपक पहुरकर, अॅड. भास्कर नेवारे, संदीता कांबळे यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)