ग्रामसेवकांनी केला ‘त्या’ कृतीचा निषेध
By admin | Published: December 2, 2015 02:19 AM2015-12-02T02:19:44+5:302015-12-02T02:19:44+5:30
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण कामाविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमधील काही ग्रामसेवकांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल
घोराड : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण कामाविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमधील काही ग्रामसेवकांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकाराचा सेलू ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निषेध करीत सदर गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनानुसार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम ग्रामसेवकांना संपूर्ण महाराष्ट्रात दिले होते. पण हे काम ग्रामसेवकाकडून काढून घेण्याविषयीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने वरिष्ठ पातळीवर दिले. या निवेदनाची कोणताही गखल न घेता रत्नागिरी व काही जिल्ह्यातील ग्रामसेवकांना हे काम सक्तीने देण्यात येऊन काम करीत नसल्याचा ठपका ठेवत बेकायदेशीर गुन्हे जिल्हाधिकारी यांनी दाखल केले. त्यामुळे येथील ग्रामसेवकावर झालेल्या अन्यायामुळे सेलू तालुक्यातील कंत्राटी ग्रामसेवक वगळता सर्वच ग्रामसेवकांनी मंगळवारी पंचायत समिती, कार्यालयात निषेध आंदोलन केले.
ग्रामसेवकावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळात कानतोडे नागपूरकर, माहुरे, उमाटे डमाळे, नव्हाळे, लोखंडे, सिर्सिकर, पुसनायके, श्रीवास्तव, देशमुख, डोंगरे, पवार, बोळे, लांजेवार, करदळे, सपकाळ, मेसरे, गावंडे, चिंचमलातपुरे, करपाते, वैरागळे उपस्थित होते.(वार्ताहर)