कॅब,एनआरसीच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 06:00 AM2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:20+5:30

सरकारने घेतलेला निर्णय भारतीय संविधानातील कलम १४ व १५ च्या विरोधात आहे. कायदा बनवितांना संविधानाचा आदर केला गेला नसून भारतीय नागरिकांच्या नैतिक अधिकाराचे उलंघन करण्यात आले. त्याचप्रमाणे या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या अमानुष वागणुकीचा या निवेदनातून निषेध नोदविण्यात आला.

Protests against Cab, NRC | कॅब,एनआरसीच्या विरोधात निदर्शने

कॅब,एनआरसीच्या विरोधात निदर्शने

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र सरकारने घेतलेले भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात गरीब नवाज तांजिम कमिटी तर्फे सेलू शहरातून रॅली काढत सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच विविध मागण्याचे तहसीलदार महेद्र सोनवणे यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
सरकारने घेतलेला निर्णय भारतीय संविधानातील कलम १४ व १५ च्या विरोधात आहे. कायदा बनवितांना संविधानाचा आदर केला गेला नसून भारतीय नागरिकांच्या नैतिक अधिकाराचे उलंघन करण्यात आले. त्याचप्रमाणे या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या अमानुष वागणुकीचा या निवेदनातून निषेध नोदविण्यात आला.
सरकारच्या या निर्णयामुळे देशात अराजकता पसरली असून हा कायदा रद्द करावा, यासाठी गरीब नवाज तजीम कमेटी, ईदि फाऊंडेशन, साहसिक जनशक्ती संघटना, नव चैत्यन बुद्ध विहार समिती, नालंदा बुद्ध विहार समिती यांच्याकडून सरकार विरोधात निदर्शने देत शहरातून रॅली काढण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
 
Web Title: Protests against Cab, NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.