वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:56 PM2019-03-13T21:56:58+5:302019-03-13T21:57:59+5:30
अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अपुऱ्या पावसामुळे वर्धेकरांना वर्षभर पाणी पुरविण्याकरिता दुरदृष्टी ठेऊन केलेली पाणी कपात स्वागतार्ह आहे. परंतू मागील तीन ते चार महिन्यांपासून चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तसेच नळाला येणारे पाणी दुषित असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वर्धेकरांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांना निवेदनातून दिला आहे.
एकीकडे जनतेला अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठा केल्या जातो तर दुसरीकडे मात्र पाणी पुरवठ्याचा संपूर्ण कर वसुल केल्या जातो, ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. मागील वर्षभरापासून शहरामध्ये सिमेंटचे रस्ते, मोठे भूमीगत नाले तसेच शहराबाहेरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे बेजबाबदारपणे काम सुरु आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर वर्धेचा पाणी प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका प्रशासाने नियोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वाघमळे यांना निवेदन देताना काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, तालुका अध्यक्ष धैर्यशील जगताप, माजी नगरसेवक कमलाकर पिंपळे, प्रशांत झाडे, पंकज इंगोले, अजय भुजाडे, हातोडे, विवेक तळवेकर, श्याम बोटकुले, विवेक डेहनकर, पंकज अनकर आदींची उपस्थिती होती.