शासकीय निवासस्थानात सोईसुविधा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:56 PM2018-03-18T23:56:31+5:302018-03-18T23:56:31+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील शासकीय निवासस्थानातील रहिवाशांना योग्य सोईसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनच्यावतीने करण्यात आली आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील शासकीय निवासस्थानातील रहिवाशांना योग्य सोईसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष अतुल तराळे यांना देण्यात आले आहे.
जुन्या जि.प. कार्यालयासमोरील या शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीतीत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी राहतात. इमारत क्रमांक १ मध्ये १६ परिवार, इमारत क्र. १/ए मध्ये ८ परिवार, इमारत क्र. २/बी मध्ये १६ परिवार, इमारत क्र. २/ए मध्ये ८ परिवार राहत असून इमारत परिसरातील एकच बोरवेलच्या सहाय्याने तेथील रहिवाशांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेथे उन्हाळ्याच्या दिवसी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होते. याचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. येथील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात याव्या. जिल्हा शल्य चिकित्सांनी नगर परिषदेला पत्र लिहित त्यातून सदर इमारतीतील रहिवाशांना नळ जोडणीचा लाभ ेदेण्याची मागणी केली आहे. ही मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी. इमारत परिसर न.प.च्या स्वच्छता कर्मचाºयांकडून नियमित स्वच्छ करण्यात यावा. तेथे मोकाट श्वानांचा वावर असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. नारिकांना सुविधा होईल यासाठी इमारत परिसरात ठिकठिकाणी बसण्याचे सिमेंटचे बेंच लावण्यात यावे, इमारत परिसरात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावा, आदी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना सुरेश पट्टेवार, मनोज खैरकार, निलीमा निहारे, के. आर. बिडकर, शालिनी शैलारे, सुरेखा माटे, वंदना गौरखेडे, मनीषा पाटील आदी उपस्थित होते.
जल संकटाला जावे लागते सामोरे
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या या निवास स्थानाच्या इमारत परिसरात एकच बोरबेल आहे. तीही उन्हाळ्याच्या सुरूवातीला तळ गाठते. त्यामुळे येथील रहिवाशांना कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागते. रहिवाशांची समस्या लक्षात घेता सोयी-सुविधा देण्याची मागणी आहे.