बँक ग्राहकांना योग्य सोयी-सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:13 AM2017-11-09T00:13:45+5:302017-11-09T00:14:00+5:30
गौरक्षण भागातील आंध्रा बँकेत रेल्वे कर्मचाºयांसह अनेकांची खाती आहेत; पण बँकेतील अपुºया मनुष्यबळासह अनेक अडचणींचा कामानिमित्त बँकेत येणाºया खातेदार नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गौरक्षण भागातील आंध्रा बँकेत रेल्वे कर्मचाºयांसह अनेकांची खाती आहेत; पण बँकेतील अपुºया मनुष्यबळासह अनेक अडचणींचा कामानिमित्त बँकेत येणाºया खातेदार नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांचा त्रास लक्षात घेता बँक व्यवस्थापकांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली. याबाबत बुधवारी आंध्रा बँक व्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले.
आंध्रा बँकेच्या गौरक्षण येथील शाखेत रेल्वे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अनेक वयोवृद्धांची खाती आहेत. तेथे कर्मचाºयांची कमतरता आहे. शिवाय बँकेचा वाढता व्याप लक्षात घेता इमारत अपुरी पडत आहे. परिणामी, कार्यालयीन वेळेत बँकेत साधे उभे राहण्यासाठीही ग्राहकांना जागा राहत नाही. शिवाय पैसे जमा करणे तथा काढण्याकरिता अपुºया खिडक्या आहेत. वयोवृद्धांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या बँक शाखेत बोरगाव (मेघे) येथील १८० बचत गटांचे आणि सावंगी (मेघे) येथील २०० बचत गटांची खाती आहेत. यामुळे येथे नेहमीच महिलांची गर्दी असते; पण येणाºया महिलांना बँकेच्या आवारात गर्दी राहत असल्याने बाहेरील झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
हा प्रकार बँकेतील ग्राहकांच्या अडचणीत भर घालणारा ठरत आहे. असे असले तरी बँक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. ग्राहकांना सुविधा देणे, हे कर्तव्य असताना ते बजावले जात नाही. यामुळे बँक व्यवस्थापकांनी लक्ष देत त्वरित योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वेळीच विचार न झाल्यास प्रहार तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, शुभम भोयर, भूषण येलेकर, चेतन वैद्य, आदित्य कोकडवार, भुमेश कुकडकर, गोविंद दिगीकर, मयूर ढोके, राजू लढी, प्रशिल धांदे, पवन धांदे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पासबुक प्रिंटींग मशीन असते बंद
आंध्रा बँकेच्या गौरक्षण शाखेतील पासबुक प्रिंटींग मशीन तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा बंदच ठेवली जाते. परिणामी, बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बँकेच्या व्यवस्थापकांनी बँकेत नवीन पासबुक प्रिंटींग मशीन लावण्याची व्यवस्था करावी, तथा अन्य समस्याही त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी प्रहार तथा ग्राहकांच्यावतीने करण्यात आली आहे.