खासगी कंपन्यांनी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 09:40 PM2018-12-04T21:40:52+5:302018-12-04T21:41:31+5:30

दिव्यांगाच्या व्यथांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे असे मलाही वाटते. शासनाच्या विविध योजना दिव्यांगांसाठी आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटाक्षाने उपाययोजना करण्यात येईल.

Provide employment to private companies by the private companies | खासगी कंपन्यांनी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

खासगी कंपन्यांनी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

Next
ठळक मुद्देशैलेश नवाल : प्रहारचा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिव्यांगाच्या व्यथांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे असे मलाही वाटते. शासनाच्या विविध योजना दिव्यांगांसाठी आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटाक्षाने उपाययोजना करण्यात येईल. खाजगी कंपन्यांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत दिव्यांगाना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल त्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर देवळीचे तहसीलदार बांबर्डे, हरिभाऊ क्षीरसागर, गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे, नायब तहसलदार प्रदिप वर्पे, भागवत, दिलीप ठाकूर, मोहन अग्रवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना दुरगुडे म्हणाले, दिव्यांगाना रोजगार कसा देऊ शकतो यासाठी प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, असे सांगितले. शिवाय त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्वयंम रोजगारांसाठी देण्यात येणारे प्रशिक्षण व कर्ज पुरवठा या विषयीही माहिती दिली.
प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी दिव्यांगाना जीवन जगत असताना दैनिक जीवनात किती हालअपेक्षा सहन करावे लागतात. शेकडो अडीअडचणींना कसे सामोरे जावे लागते यावर प्रकाश टाकत प्रशासनाने त्यांच्या अडचणी कशा दूर करता येईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी भागवत, दिलीप ठाकुर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रहारचे विदर्भ प्रमुख गजु कुबडे, हनुमंतराव झोटींग, प्रहारचे देवा धोटे, देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे प्रमुख राजेश सावरकर, वर्धा शहर प्रमुख विकास दांडगे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद कुऱ्हाडकर यांनी केले तर संचालन काळे यांनी केले. यशस्वीतेकरिता अमोल क्षीरसागर, हरिभाऊ हिंगवे, धनराज घूमे, उमेश खापरे, ज्ञानेश्वर गिरपुंजे, राजेश पंपनवार, उमेश कोकाटे, जगदीश राऊत, दीपक रघाटाटे, दर्शना पूसे, शुभम राठोड, कार्तीक फुटाणे आदींनी सहाकार्य केले.

Web Title: Provide employment to private companies by the private companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.