बेरोजगारांना त्वरित मुद्रा कर्ज उपलब्ध करुन द्या
By Admin | Published: July 1, 2016 02:14 AM2016-07-01T02:14:04+5:302016-07-01T02:14:04+5:30
केंद्र सरकार बेरोजगारांकरिता अतिशय महत्त्वाकांक्षी व भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘मुद्रा ऋण’ ही योजना राबवित आहे.
भाजयुमोची मागणी : बँक व्यवस्थापकाला निवेदनातून साकडे
वर्धा : केंद्र सरकार बेरोजगारांकरिता अतिशय महत्त्वाकांक्षी व भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘मुद्रा ऋण’ ही योजना राबवित आहे. जिल्ह्यातील बेरोजगारांना ऋण घेण्यात अडचण येत असल्याने ही योजना प्रभाविपणे राबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यावतीने निवेदनातून करण्यात आली. वंजारी चौकातील युको बँकेला घेराव घालून निवेदन देण्यात आले.
युको बँकेत मुद्रा कर्ज वितरण करण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी भाजपा पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. येथील अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बेरोजगारांना नाहक मनस्ताप होतो. याची विचारणा करण्यासाठी शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी युको बँकेत दाखल झाले. आजवर युको बँकेचे एकही ऋण प्रकरण मंजूर झालेले नाही. ग्राहकांची दिशाभुल केली जाते. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांना घेराव घालून याची विचारणा करण्यात आली.
शिष्टमंडळात श्रीधर देशमुख, निलेश पोहेकर, पवन परियाल, सुरेश पट्टेवार, राजेश शिंदे, वरुण पाठक, आकाश चौधरी, हर्ष तिवारी, रजत बत्रा, विशाल कछवा, रेवत दांडेकर, अंकीत परियाल, सचिन मोहाडकर, गौरव वानखेडे, दीपक भुतडा, सारंग नेवारे, मोहित उमाटे, शुभम पल्लीवार आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)