सेवाग्रामच्या विकास कामाकरिता भरीव निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:18 AM2018-09-08T00:18:24+5:302018-09-08T00:19:26+5:30
सेवाग्राम विकास योजनेतून २६० कोटी रुपंयाची विकास कामे मंजूर आहे. या आराखडातून मंजूर कामांप्रमाणे सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध विकास कामांना आराखड्याच्या निधीतून भरीव तरतूद करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यानी पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम विकास योजनेतून २६० कोटी रुपंयाची विकास कामे मंजूर आहे. या आराखडातून मंजूर कामांप्रमाणे सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध विकास कामांना आराखड्याच्या निधीतून भरीव तरतूद करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यानी पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे.
सेवाग्राम ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामाकरिता मुबलक निधी उपलब्ध करुन देण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनीधी व नागरिकांनी विनंती केली होती. सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून सेवाग्राम सभोवताल अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहे. या विकास कामांमध्ये सेवाग्राम ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांचा समावेश आराखड्यात केल्यास सेवाग्राम ग्रामपंचायतीला एक आदर्श गांव म्हणून विकसीत करण्यास हातभार लागेल.यापूर्वी पवनार व वरुड या ग्रामपंचायतीकरिता सेवाग्राम विकास आराखड्यातून गावांतर्गत विकास कामांकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याच धर्तीवर सेवाग्राम विकास आराखडयातून सेवाग्राम ग्रामपंचायतला विकास कामे पुर्ण करण्याकरिता भरीव निधी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.
यावेळी पालकमंत्र्यानी या मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. मुंबई येथील पालकमंत्र्यांच्या भेटी दरम्यान खा. रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषद सदस्य विजय आगलावे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलींद भेंडे, ग्रामपंचायत सेवाग्रामचे प्रतिनीधी व नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.