पं.स. कार्यालयावर महिलांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:04 AM2018-07-06T00:04:21+5:302018-07-06T00:04:52+5:30

क्रांतीकारी महिला संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन २५० महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. व आपल्या मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी धोत्रे यांना सादर केले.

P.S. Workers hit women | पं.स. कार्यालयावर महिलांची धडक

पं.स. कार्यालयावर महिलांची धडक

Next
ठळक मुद्देपोलिस पोहचले : गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : क्रांतीकारी महिला संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन २५० महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. व आपल्या मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी धोत्रे यांना सादर केले.
घरकुल आवास योजना, भाडे पट्टे, अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या महिलांना मुलभूत गरजा शासनाच्यावतीने पुरविण्यात याव्या, गिरड येथे महिलांवर झालेल्या तथाकथित अपमानास्पद वागणुक प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा या मागण्यांना घेऊन पंचायत समितीच्या आवारात गिरड, धोंडगाव, जाम, रेणकापूर, चाकुर, पिंपळगाव, हळदगाव, येथील २५० महिलांनी आंदोलन केले. यावेळी वनमाला मेश्राम, सुनिता धारणे, सुनिता मेश्राम, मनीशा मडावी, संजीवनी मडावी, ममता सूर्यवंशी, वनिता पेंदाम, कविता अलोणी आदी उपस्थित होत्या.
महिलांचा मोठा जमाव पंचायत समितीच्या आवारात जमा होत असल्याने परिस्थितीचे गांभिर्य ओळखून ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळावर पोहचून महिलांची भेट घेतली. व त्याच्याशी चर्चा केली. यावेळी उमेश हरणखेडे, स्वप्निल वाटकर, राजू जयसिंगपुरे, विरू कांबळे, सचिन रोकडे, अमोल खाडे, रंजना झिलपे, शामली बन्सोड, शीतल धाबर्डे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकाºयांना यावेळी निवेदन देण्यात आले.

Web Title: P.S. Workers hit women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.