पं.स. सभापतींचे घर व खाली जागा अधिग्रहित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:42 PM2019-08-08T23:42:41+5:302019-08-08T23:44:16+5:30

बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु असून येथील अनेकांचे घरे व जागा अधिग्रहीत करुन कामाला गती देण्यात आली. यात सेलू पंचायत समितीच्या सभापतींचेही घर येत असल्याने त्यांचे घर व खाली जागा पुर्णत: अधिग्रहीत केली नाही. राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने अधिग्रहणाअभावी महामार्गाचे काम खोळंबले आहे.

Pt. Acquire the house of the Speaker and the space below | पं.स. सभापतींचे घर व खाली जागा अधिग्रहित करा

पं.स. सभापतींचे घर व खाली जागा अधिग्रहित करा

Next
ठळक मुद्देनागरिकांची मागणी : महामार्गाचे काम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु असून येथील अनेकांचे घरे व जागा अधिग्रहीत करुन कामाला गती देण्यात आली. यात सेलू पंचायत समितीच्या सभापतींचेही घर येत असल्याने त्यांचे घर व खाली जागा पुर्णत: अधिग्रहीत केली नाही. राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने अधिग्रहणाअभावी महामार्गाचे काम खोळंबले आहे. त्यामुुळे तत्काळ अधिग्रहण करुन महामार्गाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महामार्ग क्रमांक ३६१ हा केळझर येथून गेल्याने या महामार्गाकरिता लगतचे अनेक घरे व खाली जागा महामार्ग प्राधिकरणाने अधिग्रहीत केली. त्याचा मोबदलाही घर व जमीन मालकांना दिला. कामाला सुरुवात करीत असताना अधिग्रहित केलेल्या जागेवरील अनेकांची पक्की घरे भुईसपाट करण्यात आली. परंतु पंचायत समितीच्या सभापतींचे पती विजय खोडे, प्रभाकर खोडे व रत्नाकर खोडे यांच्या मालकीच्या घराचा मोबदला दिला तरीही त्यांचे पुर्णत: अधिग्रहण केले नाही. त्यामुळे सर्विस रोडला लागून निर्माणाधीन नाली बांधकाम व इलेक्ट्रीक पोलचे काम थांबले आहे. त्यामुळे खोडे यांच्या घराचे नियमानुसार अधिग्रहण करुन कामास गती द्यावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या निवेदनावर चंद्रहास सोनटक्के, शेषराव सोनटक्के, केशरीचंद खंगारे, माजी सरपंच महावीर तिवारी, माजी उपसरपंच सियाराम आवते, दिलीप ठाकूर, भारत बेलोने, गोविंद घुमे, महेंद्र ठाकूर, प्रफुल्ल सोनटक्के यांच्यासह गावातील असंख्य नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
 

Web Title: Pt. Acquire the house of the Speaker and the space below

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.