चित्ररथातून होणार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:33 PM2018-08-08T22:33:36+5:302018-08-08T22:34:20+5:30
जि. प. कृषी विभागाच्यावतीने आठ चित्ररथ तयार करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मुलन तसेच किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या चित्ररथाला बुधवारी पंचायत राज समितीच्या सदस्यांनी हिरवी झेंडी दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जि. प. कृषी विभागाच्यावतीने आठ चित्ररथ तयार करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मुलन तसेच किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या चित्ररथाला बुधवारी पंचायत राज समितीच्या सदस्यांनी हिरवी झेंडी दाखविली.
सदर कार्यकमाला पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आ. सुधीर पारवे, आ. भरतसेठ गोगावले, आ. रनधीर सावरकर, आ. विक्रम काळे, आ. दत्तात्रय सावंत, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, अति. मु.का.अ. पी. व्ही. बन्सोडे, विवेक इलमे, विपुल जाधव, शालिक मेश्राम, अश्विनी भोपळे, संजय बमनोटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. हे चित्ररथ जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, कृषी सभापती मुकेश भिसे व जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे. हे चित्ररथ गावागावात जाऊन ३१ आॅगस्टपर्यंत जनजागृती करणार आहे. शिवाय तज्ज्ञ व्यक्ती गावसभा घेत शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहे.