दिंडीच्या माध्यमातून कीटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती

By Admin | Published: June 19, 2017 01:13 AM2017-06-19T01:13:26+5:302017-06-19T01:13:26+5:30

आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा व ग्रामपंचायत रत्नापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढून कीटकजन्य

Public awareness on pesticides and waterborne diseases through Dindi | दिंडीच्या माध्यमातून कीटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती

दिंडीच्या माध्यमातून कीटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती

googlenewsNext

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा व ग्रामपंचायत रत्नापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढून कीटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती करण्यात आली. या दिंडीला जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अयुब अली तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, ग्रामपंचायत सदस्य गीता कुमरे, कल्पना शेंदरे, नरहरी आखूड, विमल कन्नाके, हंसा राऊत, आरोग्य सेवक निलेश साटोणे यांची उपस्थिती होती.
डॉ. चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना लोकांच्या सहार्याशिवाय कुठल्याही शासकीय योजना खऱ्या अर्थाने पूर्णत्त्वास जाऊ शकत नाही. किटकजन्य व जलजन्य आजाराना आळा घालण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून सहकार्य करावे. घर व परिसर पाणी साचनार नाही, त्यात डासांची निर्मिती होणार नाही याची काळजी घेत प्रत्येक आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे सांगितले.
पावसाचे पाणी साचून राहील अश्या कोणत्याही वस्तू बाहेर ठेवू नका. त्याचप्रमाणे कुलरमधील पाणी नियमित बदलवावे. अनावश्यक वस्तुचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. घरातील शौचालयाच्या वँन्ट पाईपला साधे कापड बांधा. खताचे उकुरडे गावापासून दूर ठेवा असे उपाय केल्यास आपले गाव रोग मुक्त राहू शकते असेही ते म्हणाले. हुसनापूर व रत्नापूरच्या भजनी मंडळींनी दिंडीत सहभाग घेतला होता. संचालन उटाणे यांनी तर आभार घोडमारे यांनी मानले.

Web Title: Public awareness on pesticides and waterborne diseases through Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.