पुलगावकरांकरिता पेणचे बाप्पा दाखल
By admin | Published: September 3, 2016 12:09 AM2016-09-03T00:09:22+5:302016-09-03T00:09:22+5:30
विघ्नहर्त्याच्या आगमणाला आता अवगे पाच दिवस शिल्लक आहेत. एकेकाळी गणेशोत्सवाच्या प्रसिद्धीस असलेल्या पुलगावात
बाप्पाच्या आगमणाची तयारी : शहरात मूर्तीकार साकारत आहेत २ हजार गणेशमूर्ती
प्रभाकर शहाकार पुलगाव
विघ्नहर्त्याच्या आगमणाला आता अवगे पाच दिवस शिल्लक आहेत. एकेकाळी गणेशोत्सवाच्या प्रसिद्धीस असलेल्या पुलगावात गणरायांच्या विविध रूपातील विविध आकाराच्या जवळपास २ हजार मूर्तीवर कलावंतांकडून अखेरचा हात फिरविल्या जात आहे. स्थानिक कलावंतांनी केलेल्या मूर्तीची मागणी असताना गणेश मूर्तीकरिता प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण येथील मूर्ती शहरात विक्रीसाठी दाखल झाल्या आहे.
शहरात गणेशाच्या मूर्ती तयार करणारे २० ते २५ कुटुंब आहेत. काही नामवंत मूर्तीकार दोन पिढ्यांचा वारसा जपत तो तिसऱ्या पिढीतील युवा कलावंतांना देत आहेत. या कलावंतांनी जुनी कला आणि नवा लूक यांचा संगम बसवून नवनव्या मूर्ती निर्माण केला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्त्यांना महागाईची झळ चांगलीच पोहचली असलील तरी या मूर्त्यांच्या निर्मितीवर बाजीराव मस्तानी चित्रपट व जय मल्हार सिरीयलचा परिणाम जाणवत आहे. पेशवाई गणेशमूर्ती तसेच जय मल्हार गणेशमूर्तीची भक्तांकडून मागणी आहे. गणेशोत्सवासाठी मूर्ती पूजासाहित्य व सजावटीचे सामान यातून जवळपास ५० लाखांची आर्थिक उलाढाल होत असते. शहरात प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीही विकल्या जात आहे. पेण येथून शाडूच्या मूर्त्या विक्रीसाठी आल्या असून त्याही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.