पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार दंडात्मक कारवाई
By admin | Published: June 4, 2015 01:57 AM2015-06-04T01:57:54+5:302015-06-04T01:57:54+5:30
गत पाच दिवसांपासून पालिकेच्यावतीने शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे.
आर्वी : गत पाच दिवसांपासून पालिकेच्यावतीने शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. या अतिक्रमण मोहिमेचा अखेरचा दिवस असून तत्पूर्वी ज्या ठिकाणी अतिक्रमण अद्यापही काढण्यात आले नाही ते तातडीने काढावे, यापुढे अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे.
शहर स्वच्छ व वाहतुकीच्या कोंडीपासून मुक्तता मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवारपासून पुन्हा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ वाजतापासून आर्वीतील शिवाजी चौक परिसरासमोरील पुलगाव मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात मोठ्या प्रमाणावर छोट्या व्यावसायिकांचे दुकान हटविण्यात आले. परंतु पक्के बांधकामाचे अतिक्रमण का पाडण्यात येते नाही, असा आरोप होत आहे. याबाबत पालिकेने भेदभाव ठेवू नये, अशी मागणी पुढे येत आहे. यथील सिव्हील लाईन परिसरात व न्यायालयसमोरील भागात मोठ्या प्रमाणावर पक्के बांधकाम आहे. त्यामुळे पालिकेने सरसकट अतिक्रमीत भागातील अतिक्रमण काढावे आता अतिक्रमण मोहिमेला सुरुवात केल्याने आर्वीत असणारे पक्के बांधकामाचे अतिक्रमण काढण्याची मागणी पुढे येत आहे. या अतिक्रमण मोहिमेबाबत सातत्याने लोकमतच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याने सामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे.(तालुका प्रतिनिधी)