सहा दिवसांपासून नाफेडची चणा खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:46 PM2018-04-30T22:46:23+5:302018-04-30T22:46:38+5:30
शेतकरी हिताचा निर्णय राज्य सरकार घेत असले तरी प्रत्यक्ष शेतकºयांच्या पदरी मात्र घोर निराशाच येत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाफेडने आर्वीत सुरू केलेली चणा खरेदी जागेअभावी सहा दिवसापासून बंद आहे. यामुळे शेतकºयांत कमालीचा रोष आहे.
सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शेतकरी हिताचा निर्णय राज्य सरकार घेत असले तरी प्रत्यक्ष शेतकºयांच्या पदरी मात्र घोर निराशाच येत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाफेडने आर्वीत सुरू केलेली चणा खरेदी जागेअभावी सहा दिवसापासून बंद आहे. यामुळे शेतकºयांत कमालीचा रोष आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्यावतीने १० एप्रिलपासून ४ हजार ४०० या हमी भावाने चणा खरेदी सुरू झाली. २४ एप्रिलपर्यंत येथे ११८ शेतकºयांकडून १९५६.४८ क्विंटल चणा खरेदी झाला आहे. यात गत २५ एप्रिलपासून चणा ठेवण्यासाठी गोदामच उपलब्ध नाही. हे कारण पुढे करीत गत सहा दिवसांपासून आर्वीत नाफेडची तूर खरेदी बंद आहे. यामुळे नाईलाजास्तव आपले काम भागविण्यासाठी शेतकºयांना खाजगी व्यापाºयांना ३००० ते ३२०० या अल्पदराने चणा विकावा लागत आहे. नाफेडची धिम्यागतीने चणा खरेदी सुरू आहे. यातही ११८ पैकी एकाही शेतकºयाला विकलेल्या शेतमालाचा चुकारा मिळाला नाही.
अधिकारी म्हणतात..
या विलंबाबाबत अधिकºयांना विचारणा केली असता नाफेडचे मुंबई स्थित कार्यालय जळाल्याने चणा खरेदीचा हिशेबच जुळत नाही. यामुळे आता नाफेडने चणा खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आले आहे. या धोरणाविरूद्ध शेतकºयात रोषाची भावना आहे.
नाफेडने चणा खरेदी अचानक बंद केल्याने शेतकºयांची मोठी आर्थिक कुचंबना होत आहे. आपले काम भागविण्यासाठी दीड हजार रुपयांने कमी भावाने चणा खाजगी व्यापाºयांना विकावा लागत आहे.
- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे)
गोदामात चणा ठेवण्यासाठी जागा नाही. नाफेडने ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध करून द्यावे, यासाठी वेळोवेळी सांगण्यात आले आहे. यावर तातडीने तोडगा काढण्याचे कळविले आहे.
- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी