सेलूत धान्य खरेदी तर वर्धेत तारण योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:14 PM2018-10-15T22:14:10+5:302018-10-15T22:14:25+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या उपबाजारपेठ सेलू येथे नवीन हंगामाकरिता धान्य यार्डचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या उपबाजारपेठ सेलू येथे नवीन हंगामाकरिता धान्य यार्डचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या बाजारपेठेत उद्घाटनापूर्वीच १८ हजार क्विंटल सोयाबीन व इतर शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणून ठेवला होता. या कार्यक्रमाला सभापती विद्याधर वानखेडे, संचालक बबन हिंगणेकर, केसरीचंद खंगार उपस्थित होते.
समीर देशमुख व विद्याधर वानखेडे यांच्या हस्ते धान्य विकायला आणणाऱ्या शेतकरी बांधवांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी सोयाबीनला ३ हजार ७० रूपये भाव देण्यात आला. ४ हजार क्विंटलचाच लिलाव यावेळी झाला. कार्यक्रमाला उपसभापती रामकृष्ण उमाटे, केसरीचंद खंगार, राजेश जयस्वाल, शेख गणी, शिला धोटे, काशिनाथ लोणकर, अनिल जीकार, संजय तडस, विठ्ठल कौरती आदी उपस्थित होते.
तर वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०१८-१९ करीता सोयाबीन तारण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. काटापूजन व तारण योजनेचा शुभारंभ राज्य कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, लोकलेखा समितीचे सदस्य जयंत उर्फ गुंडू कावळे, जयंत येरावार, जि. प. सदस्य विमल वरभे आदी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, रमेश खंडागळे, प्रकाश पाटील, मुकेश अळसपुरे, विजय बंडेवार, जगदीश म्हस्के, कमलाकर शेंडे, दत्ता महाजन, गंगाधर डोखोळे, भूषण झाडे आदी उपस्थित होते. यावेळी वायफड येथील शेतकरी शैलेश घोडमारे, आशुतोष मोहोड, सालोडचे प्रमोद वांदिले यांचे सोयाबीन तारण योजनेत ठेवून त्यांना सोयाबीन किंमतीच्या ७५ टक्के रक्कमेचा धनादेश तात्काळ प्रदान करण्यात आला. तसेच त्यांचा शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या तारण योजनेचा शेतकºयांना लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती श्याम कार्लेकर यांनी केला. शेतकºयांनी आपला शेतमाल स्वच्छ करून, वाळवून आणावा, सोबत २०१८-१९ चा सातबारा उतारा, आधार कार्ड आणावे, असेही ते म्हणाले.