क्रांतिवीर महादेव ठाकरे कार्य नवीन पिढीसमोर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 08:20 PM2018-08-27T20:20:59+5:302018-08-27T20:21:18+5:30

स्व. महादेव ठाकरे यांच्या कार्याची जाणीव नव्या पिढीत ठेवण्यासाठी आंतरिक बळ देण्याची गरज आहे. पुतळ्याची व ठाकरे मार्केटची दुरावस्था बघता तातडीने याचा पाठपुरावा करून पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. ठाकरे मार्केट येथे माजी आमदार स्व. महादेव ठाकरे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. स्व. महादेव ठाकरे यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त ठाकरे मार्केट येथील पुतळ्याजवळ पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.

Put Krantiveer Mahadev Thackeray in front of a new generation | क्रांतिवीर महादेव ठाकरे कार्य नवीन पिढीसमोर ठेवा

क्रांतिवीर महादेव ठाकरे कार्य नवीन पिढीसमोर ठेवा

Next
ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : ५६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात वाहिली भावपूर्ण श्रद्धाजंली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्व. महादेव ठाकरे यांच्या कार्याची जाणीव नव्या पिढीत ठेवण्यासाठी आंतरिक बळ देण्याची गरज आहे. पुतळ्याची व ठाकरे मार्केटची दुरावस्था बघता तातडीने याचा पाठपुरावा करून पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. ठाकरे मार्केट येथे माजी आमदार स्व. महादेव ठाकरे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. स्व. महादेव ठाकरे यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त ठाकरे मार्केट येथील पुतळ्याजवळ पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार वसंत कार्लेकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश सराफ, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी नगराध्यक्ष चंद्रशेखर खडसे, ज्योती लुंगे उपस्थित होते. शंकर अग्निहोत्री यांनी महाकाली शिक्षण संस्थेत होणाऱ्या गॅदरिंग कार्यक्रमात क्रांतीवीर स्व. महादेव ठाकरे यांच्या नावानी पुरस्कार देण्याची घोषणा यावेळी केली. माजी आमदार कार्लेकर यांनी प्रत्येक कुटुंब सुखी व्हावे यासाठी स्व. ठाकरे यांची आंतरिक तळमळ होती. गावागावात शिबिरे व बौद्धिक मार्गदर्शन करीत जनता जनार्दनाची सेवा करण्यात धन्यता मानणाºया या महापुरूषाचे विचार जीवंत ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रास्ताविक स्व. ठाकरे यांचे नातू नवीन व्ही. ठाकरे यांनी केले. त्यांनी माजी आमदार माणिक सबाणे यांनी ठाकरे मार्केट व पुतळ्याची स्थापना केल्याचे सांगून स्व. ठाकरे यांच्या पुतळ्याची दुरावस्था बघुन आंतरिक दु:ख होत असल्याची भावना व्यक्त केली. प्रारंभी दीप प्रज्वलन करून व स्व. ठाकरे यांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरूदेव प्रचारक बा.दे. हांडे व गंगाधर जगताप यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीतेमधील विचार व्यक्त केले. आभार मनीष जगताप यांनी मानले. आयोजनात सुभाष ठाकरे, संतोष इंगळे, प्राचार्य मदन मोहता, शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ दंडारे, सौरभ इंगळे, श्रीराम इंगळे, विनोद इंगळे, यशवंत वसू, दाते, भूषण वैद्य, मनोज राऊत, भैय्या जुमडे, विवेक तळवेकर, सैयद एजाज, हितेश पांडे, लुंगे, पप्पु कुकडे, पुजा ठाकरे, शेंडे या सर्वांनी सहकार्य केले. ठाकरे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला पालिका पदाधिकारी व सत्ताधारी पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. यावेळी नागरिक, विद्यार्थी आदींनी स्व. ठाकरे यांच्या पुतळयाला आदरांजली वाहिली.

Web Title: Put Krantiveer Mahadev Thackeray in front of a new generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.