गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:12 PM2017-08-26T23:12:50+5:302017-08-26T23:13:08+5:30

वीरशैव सेवा मंडळच्यावतीने रामनगर येथील शिवमंदिरात गुणवंत विद्यार्थी, गरीब होतकरु विद्यार्थी सत्कार समाजातील आचार्य पदवीप्राप्त व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

 Quality student felicitation ceremony | गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देआचार्य पदवी प्राप्त करणाºयांसह ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वीरशैव सेवा मंडळच्यावतीने रामनगर येथील शिवमंदिरात गुणवंत विद्यार्थी, गरीब होतकरु विद्यार्थी सत्कार समाजातील आचार्य पदवीप्राप्त व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आकाश मिटकरी, ईशा देमापुरे, वेदांत घोडकी, अनिकेत डांगोरे, मयुरी खारपोटे, अंकिता खारपाटे, प्रसाद कोमलवार, साक्षी मोकाशी, रितेश नगरे, संस्कृती आजने, वैभवी बेलसरे, श्रेया महाजन, सिद्धी हिंगमिरे, वेदान्द्र तेले, संकेत ढोले, साक्षी कारंजेकर, ओंकार नरहरशेट्टीवार, तसेच गरीब होतकरू विद्यार्थी सायली मोतेवार, श्रद्धा पटेवार, अभय मोकाशी, निखीता महाजन, शुभम गाडेकर यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून संत सयाजी महाराज, नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रा. भीमराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समाज भूषण पुरस्कार डॉ. तनवी पांडे, प्रा. डॉ. आेंकारआप्पा गंजीवाल े(पी.एच.डी.प्राप्त), प्रा. डॉ. राजीव जाधव (पी.एच.डी.प्राप्त), प्रा.डॉ. रविंद्र हवा (पी.एच.डी.प्राप्त), शिवलिंग सी. नगरे (समाज भूषण) पुरस्कार, श्री संत सयाजी महाराज, अतुल तराळे, प्रा. भीमराव पाटील, लातुर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. वामनराव उमाटे, मालती देमापुरे, अशोक मरडवार, रत्ना मरडवार, वसंत ईरावार, बबन अक्कलवार, प्रभा अक्कलवार यांचा सत्कार श्रीफळ व स्मृति चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. संचालन किरण पटेवार यांनी केले तर आभार उपाध्यक्ष रवींद्र बाळापुरे यांनी मानले. आयोजनाकरिता सर्वांनी सहकार्य केले.

Web Title:  Quality student felicitation ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.