४,८८६ तूर उत्पादक आॅनलाईन नोंदीच्या रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:38 PM2018-05-05T23:38:10+5:302018-05-05T23:38:10+5:30

शासकीय तूर खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले. यात तूर खरेदी बंद करण्याच्या काळात अचचानक आॅनलाईन नोंदी करण्याच्या पद्धतीत बिघाड आल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८८६ तूर उत्पादकांची नोंद झाली नाही.

Quantity of 4,886 producer's online logos | ४,८८६ तूर उत्पादक आॅनलाईन नोंदीच्या रांगेत

४,८८६ तूर उत्पादक आॅनलाईन नोंदीच्या रांगेत

Next
ठळक मुद्देअनेकांची तूर घरीच पडून : कागदपत्र सादर केलेल्यांकडून नोंदणीची मागणी

रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा - शासकीय तूर खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले. यात तूर खरेदी बंद करण्याच्या काळात अचचानक आॅनलाईन नोंदी करण्याच्या पद्धतीत बिघाड आल्याने जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८८६ तूर उत्पादकांची नोंद झाली नाही. परिणामी त्यांच्या तुरीला शासकीय दर मिळण्याची आशा मावळली आहे.
गोदामाची समस्या आल्याने शासनाच्यावतीने तूर खरेदी बंद करण्यात आली. यानंतर बºयाच शेतकऱ्यांची तूर घरीच पडून होती. यामुळे बरीच ओरड झाली. यामुळे शासनाच्यावतीने बंद करण्यात आलेली तूर खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. या खरेदीला १५ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यातही ज्या शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंद झाली आहे त्यांचीच तूर खरेदी करण्यात येणार आहे. असलेल्या मुदतीचा कालावधी अत्यल्प असल्याने या काळात तूर खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे.
१८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद झाली. खरेदी अचनाक बंद झाल्याने शेतकºयांत चांगलाच असंतोष पसरला. याच काळात आॅनलाईन नोंदणीही बंद झाली. परिणामी नोंदणी केंद्रावर पेरीपत्रक आणि इतर कागदपत्र देवूनही अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या नाही. यामुळे त्यांच्या तुरीला शासकीय दर मिळण्याची आशा मावळल्या. जिल्ह्यात असलेल्या सात खरेदी केंद्रावर अनेक शेतकºयांनी कागदपत्र देवून ठेवले आहे. त्यांची अडचण होणार असल्याचे दिसून आले आहे.
या नोंदीकरिता पुलगाव शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ते निवळण्याकरिता पोलिसांना पाचारण करण्यात आले. या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदी करून तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिल्याने वातावरण निवळले. तशी मुदतवाढ करण्याची मागणी मार्केटंीग अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यवर काय मार्ग निघतो याकडे तूर उत्पादक शेतकºयाच्या नजरा लागल्या आहेत.
तुरीच्या समस्येने चणा खरेदी प्रभावित
सध्या तूर खरेदीची समस्या डोके वर काढून आहे. नोंदीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची नोंद करण्याची मागणी जोर धरत आहे. तर नोंद झालेल्या अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे बाकी आहे. मुदत संपण्याकरिता नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात खरच एवढ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व प्रकारामुळे चण्याची खरेदीही प्रभावित होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या तीन केंद्रावरून आतापर्यंत १७४ शेतकऱ्यांकडून २,८८५ क्विंटल चणा खरेदी झाली आहे. तर आतापर्यंत ९७५ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. त्यांचा चणा खरेदी करणे अद्याप बाकी आहे. वर्धा, पुलगाव, देवळी आणि समुद्रपूर या केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची आहे.
नोंदणी झालेल्या ३,३२६ शेतकऱ्यांची तूर घरीच
तूर खरेदीची मुदतवाढ झाल्याने जिल्ह्यातील सातही केंद्रांवर पुन्हा खरेदी सुरू झाली. या केंद्रांवर जिल्ह्यात तब्बल ९ हजार ६३३ शेतकऱ्यांची नोंद केली आहे. त्यापैकी ६ हजार ३०७ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७२ हजार ३९०.८५ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. नोंद झालेल्या तब्बल ३ हजार ३२६ शेतकऱ्यांची तूर अद्याप घरीच पडून असून तिची खरेदी होणे बाकी आहे. यात आता पुन्हा नोंदी होणे शिल्लक आहे. यामुळे तूर खरेदीत अनागोंदी झाल्यास प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटून पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Quantity of 4,886 producer's online logos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.