साहित्य वाटपाची चौकशी थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 08:23 PM2018-08-27T20:23:06+5:302018-08-27T20:23:28+5:30
वर्धा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना द्यावयाचे साहित्याचे तब्बल आठ वर्षानंतर वितरण रातोरात पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याप्रकरणात पंचायत राज समितीच्या सुचनेनंतरही चौकशी प्रारंभ करण्यात आली नाही हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : वर्धा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना द्यावयाचे साहित्याचे तब्बल आठ वर्षानंतर वितरण रातोरात पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याप्रकरणात पंचायत राज समितीच्या सुचनेनंतरही चौकशी प्रारंभ करण्यात आली नाही हे विशेष.
सन २०१० ते २०१५ सन २०१५ ते २०१६ या वर्षाचे साहित्य इतके वर्ष पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये पडून असल्याने त्यामध्ये काटेरी तार जिर्ण झाला. लाभार्थ्यांने शेतावर लावले असता त्याचे जागो जागी तुकडे पडत होते. तसेच शिलाई मशीन या इतके वर्ष जंगून पडल्यामुळे उपयोगात येण्याजोगे नव्हत्या.
सदर प्रकार पंचायत राज समितीच्या समुद्रपूर पं. स. भेटी दरम्यान पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांना पं.स. सदस्य गजानन पारखी यांनी प्रत्यक्ष भेट घेवून लक्षात आणूून दिला.
या विषयावर पंचायत राज समितीच्या बैठकीमध्ये तब्बल २० मिनीटे चर्चा होवून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याबाबत लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करणे आठही पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात आलेले साहित्य (मागील सात वर्षापासून साहित्य) लाभार्थ्यांस वेळीस वाटप केलेले नाही. यासाठी दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याची चौकशी करावी तसेच हे साहित्य पंचायत समितीस्तरावर इतके वर्ष का शिल्लक राहिले यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागातील कोणता अधिकारी जबाबदार आहे याची चौकशी करून अहवाल सादर करावा. तसेच समुद्रपूर पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी शंकर हेडावू यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कडून मागविण्यात यावा, अशा आशयाचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांना लेखी स्वरूपात दिले आहे.
१८ दिवसाचा कालावधी उलटूनही या गंभीर प्रकरणाबाबत अजूनपावेतो कुठलीही चौकशी करण्यात आली नाही. यावरून पंचायत राज समितीच्या आदेशालाही जि.प.चे अधिकारी जुमानत नसल्याचे चित्र दिसून येते. सदर प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
दोनदा घडला पंचायत समितीत प्रकार
समुद्रपूर पंचायत समितीत यंदा दोनदा जुने साहित्य वाटण्याचा प्रकार घडला. जुन्या सायकली शाळेकरी विद्यार्थीनींना वाटण्यात आल्या. त्याच्या पालकांनी मिळालेले जंगलेले साहित्य कसेबसे घरी नेले. काही मुळींचा या जुन्या साहित्यामुळे हिरमोड झाला. या प्रकाराला पंचायत समितीचे अधिकारी जेवढे दोषी आहेत त्यापेक्षा अधिक दोषी जिल्हा परिषदेचे अधिकारी दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी आहे.