राणी बनणार फौजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:52 PM2019-03-09T23:52:12+5:302019-03-09T23:53:34+5:30

एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) परीक्षेत मुलींमधून महाराष्ट्रात सहावी व एन. टी. प्रवर्गातून राज्यात पहिली येऊन हिंगणघाट येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेची विद्यार्थिनी वर्षा ऊर्फ राणी राजू तांदूळकर हिने नवा अध्याय रचला.

The queen will become a fighter | राणी बनणार फौजदार

राणी बनणार फौजदार

Next
ठळक मुद्देपीएसआयची शारीरिक चाचणी। १०० गुण मिळविले

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) परीक्षेत मुलींमधून महाराष्ट्रात सहावी व एन. टी. प्रवर्गातून राज्यात पहिली येऊन हिंगणघाट येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेची विद्यार्थिनी वर्षा ऊर्फ राणी राजू तांदूळकर हिने नवा अध्याय रचला.
पोलीस उपनिरीक्षक पदाचा ८ मार्चला निकाल जाहीर झाला आणि या अभूतपूर्व निकालात राणी तांदूळकर हिने मुलींमधून महाराष्ट्रातून सहाव्या स्थानी येत हिंगणघाट शहराचे नाव महाराष्ट्रात उंचावले.
राणीचे यश केवळ अभ्यासिका परिवारासाठीच नव्हे, तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असे यश आहे. वडिलांचे छत्र लहानपणीच हरविले, अशातच आईने लोकांच्या घरी मोलमजुरी करून दोन मुलांची शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेला, दोघा भावंडांमध्ये एकटीच भक्कम अशी आधार असलेली आई. घरची परिस्थिती बेताची असताना आईच्या कष्टाला झेपेल एवढे तरी शिक्षण घ्यायचे म्हणून पदवीच्या पहिल्याच वर्षाला संपूर्ण विषयात अनुत्तीर्ण झालेल्या राणीने अपयशाने न खचता स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला.
स्पर्धा परीक्षेच्या रणांगणामध्ये तयारीनिशी उतरलेल्या राणीने स्वामी विवेकानंद अभ्यासिकेद्वारा सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेतला. पहिल्याच वर्षी राणीने लिपिक टंकलेखक परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली. या गरुडझेपेने वर्ग ३ ची तयारी करणारी राणी केवळ वर्ग एकच्या परीक्षेची तयारी करू लागली.
दोन महिन्यांपूर्वी राणी राजू तांदूळकर हिची वर्धा जिल्हा न्यायालयात निवड झाली. ती महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनात नेतृत्व करणार असून हा अभिमान केवळ तिचा नसून हलाखीच्या परिस्थितीतही तिच्या पाठीशी भक्कमपणे असलेली आई, भाऊ आणि अभ्यासिकेचे संचालक प्रा. योगेश वानखेडे यांचा आहे. तिच्या यशामुळे हिंगणघाट शहराचे जिल्ह्यात नाव उंचावले आहे.

Web Title: The queen will become a fighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.