‘तिच्या’ मृत्यूची चौकशी करून नराधमांना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:39 PM2018-03-24T21:39:36+5:302018-03-24T21:39:36+5:30

सेलू तालुक्यातील धपकी शिवारात अनोळखी युवतीचा नग्न मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटली असून शुभांगी पिलाजी ऊईके (१९), असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Quench her 'death' by investigating her 'death' | ‘तिच्या’ मृत्यूची चौकशी करून नराधमांना फाशी द्या

‘तिच्या’ मृत्यूची चौकशी करून नराधमांना फाशी द्या

Next
ठळक मुद्देसयाम यांची मागणी : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमत
वर्धा : सेलू तालुक्यातील धपकी शिवारात अनोळखी युवतीचा नग्न मृतदेह आढळला होता. तिची ओळख पटली असून शुभांगी पिलाजी ऊईके (१९), असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची चौकशी करून नराधमांना फाशी द्या, अशी मागणी गोंडवाना एकता परिषदेचे अवचित सयाम यांनी केली आहे.
शुभांगीच्या मृत्यू प्रकरणी १९ मार्च रोजी दहेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शुभांगी दहेगाव येथे मैत्रीणीच्या साक्षगंधाला गेली होती. सायंकाळी ती मैत्रीणींसह परत निघाली. मैत्रीणी घरी पोहोचल्या व शुभांगी शेतातील आपल्या घराकडे निघाली; पण घरी पोहोचली नाही. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने शोध घेतला असता रेल्वे फाटकाजवळ तिचा मृतदेह आढळला. सँडल व पायावरून ओळख पटली. मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने हत्या की आत्महत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तपास प्रभारी ठाणेदार विलास काळे यांच्या मार्गदर्शनात संघपाल इंगोले व रवी पुरोहित करीत आहेत.
शुभांगीच्या अंगावर वस्त्र नसून कपडे काढून कुणी आत्महत्या करणार नाही. यामुळे तिच्यावर बलात्कार झाला असावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून नराधमांना फाशी द्यावी, अशी मागणी सयाम यांनी केली आहे. याबाबत अनु. जनजाती आयोग न्यू दिल्ली, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: Quench her 'death' by investigating her 'death'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.