पडेगावच्या सर्वोदय गोशाळेत चाऱ्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:20 AM2018-04-09T01:20:40+5:302018-04-09T01:20:40+5:30
जनावारांची वाहतूक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनावरे जप्त करण्यात येतात. ती जनावरे पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत आणण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : जनावारांची वाहतूक करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनावरे जप्त करण्यात येतात. ती जनावरे पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत आणण्यात येते. सध्या या गोशाळेत ३०० च्यावर जनावरे आहेत. यातच उन्हाळा सुरू झाला असून येथे आता चाºयाची समस्या निर्माण झाली आहे. शासनाच्या कारवाईतील जनावरे असताना त्यांच्याकडून कुठलीही मदत मिळत नसल्याने या जनावरांच्या संगोपणाची समस्या निर्माण झाली आहे.
देवळी तालुक्यातील पडेगाव येथे सर्वोदय गोशाळा चॅरीटेबल ट्रस्टद्वररे गोशाळा सुरू आहे. सध्या या गोशाळेची समस्या बिकट झाली आहे. चाºयाकरिता गोशाळेला भटकंती करावी लागते. सेलू पोलीस ठाण्याच्यावतीने कारवाई करून ६ एप्रिल रोजी ३ बैल जप्त केले होते. ते बैल रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवून आज सकाळी या गोशाळेची माहिती घेत येथे आणण्यात आले. त्यांची रवानगी शनिवारला पडेगाव येथील गोशाळेत करण्यात आली.
यापुर्वी २३ मार्चला जे.एम.एस.सी. कमांक ३ यांच्या आदेशावरून ५६ जनावरांची कस्टडी याच गोशाळेत कायम ठेवण्यात आली आहे. याउपर काही गोपालकांकडूनही त्यांची जनावरे येथे सोडण्यात येते. उन्हाळा सुरू झाला असून चारा आणि पाणी टंचाईची समस्या डोके काढत आहे. एवढ्या जनावरांची जनावरांची देखभाल कशी करावी असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. शासनाच्यावतीने जनावरांच्या नावावर अनुदान घेणाºया अनेक संस्था आहेत. त्यांना या जनावरांची कुठलीही जबाबदारी देण्यात येत नाही. जनावरांच्या पालन पोशनाची जबाबदारी पेलण्याकरिता शासनाच्यावतीने अनुदान पुरविण्यात येण्याची मागणी या गोशाळेच्या संस्थाध्यक्षांकडून करण्यात येत आहे. त्यांना जनावरांच्या पालन पोशनाकरिता तारेवरची कसरत कराची लागत असल्याची माहिती गोशाळेचे अध्यक्ष वसंत पंचभाई यांनी दिली.
संस्थेसमोर जनावरांच्या पालन-पोषणाची समस्या
सध्या उन्हाळा सुरू होत आहे. या दिवसात जनावरांना चारा कुठून आणावा अशी नवी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे या काळात जनावरांचे पालन-पोषण कसे करावे असा प्रश्न या गोशाळेच्या व्यवस्थापकांसमोर आला आहे. यामुळे शाळेला शासनाने चारा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.