मान्सूनपूर्व पावसाने मृग संत्रा बहार फुटण्याबाबत प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:14 PM2020-06-06T16:14:04+5:302020-06-06T16:14:26+5:30
3 व 4 जून ला झालेल्या मान्सून पूर्व अपुऱ्या पावसाने कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असून या पावसाने मृग बहार येईलकी नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: 3 व 4 जून ला झालेल्या मान्सून पूर्व अपुऱ्या पावसाने कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असून या पावसाने मृग बहार येईलकी नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. संत्र्याला मृग बहार येण्याकरिता उन्हाळ्यात जमिनीचा दर्जा पाहून शेतकरी ओलिताचे पाणी देणे थांबवितात व नंतर जमीन भरपूर तापल्यावर मान्सूनच्या भरपूर पावसाची वाट पाहतात त्यामुळे झाडांना मृग बहार येतो परंतु यावर्षी मान्सून पूर्व झालेला हा अपुरा पाऊस असून पुढील काही दिवस येण्याचा अंदाज नसल्याचे हवामान खात्याने सांगितले असल्याने शेतकऱ्यांचे नगदी संत्रा पीक हातून जाते की काय याबाबत शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जर ओलिताचे पाणी संत्रा झाडांना दिले तर त्या ओलिताच्या पाण्यावर फुटलेला संत्रा बहार दीर्घकाळ टिकत नाही असा शेतकऱ्यांचा ठाम विश्वास असल्याने ते संत्रा झाडांना आता ओलू शकतसुद्धा नाहीत. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे
याबाबत शेलगाव लवणे येथील प्रगतशील संत्रा उत्पादक शेतकरी रवी पठाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी माझ्या झाडांना 20 मे पर्यंत ओलिताचे पाणी दिले एवढ्या लवकर मान्सून पूर्व पाऊस येईल अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे जमीन पूर्ण तापण्या पूर्वी झालेला हा पाऊस संत्रा उत्पादकांसाठी धोक्याचा ठरू शकतो शिवाय यावेळेस ओलिताचे पाणी किती ओला य चे व त्यामुळे आलेला बहार टिकेल की नाही याबाबत शंका असल्याने ओलीत ही करू शकत नाही.