राधिका अन् सिमरन जिल्ह्यातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:49 PM2019-05-28T23:49:20+5:302019-05-28T23:49:52+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे.

Radhika and Simran first in the district | राधिका अन् सिमरन जिल्ह्यातून प्रथम

राधिका अन् सिमरन जिल्ह्यातून प्रथम

Next
ठळक मुद्देगो.से. वाणिज्यचे विद्यार्थी चमकले : दोघींनी मिळविले ९६.४७ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीच केली आहे. वर्धा शहरातील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाच्या राधिका तापडिया व सिमरन थदानी यांनी समान टक्के गुण संपादीत करून जिल्ह्यातून प्रथम आल्या आहेत. त्यांनी ९६.४७ टक्के गुण संपादीत केले आहे. तर गो. से. वाणिज्य महाविद्यालयातीलच अभिषेक झोडे यांने ९५.६९ टक्के तर चित्रिका गेलानी हिने ९५.५४ टक्के गुण संपादित करून अनुक्रमे जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय स्थानी राहिले.
यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ६ हजार ६४० विद्यार्थ्यांनी प्रथमच परीक्षेचे अर्ज भरले होते. शिवाय ६ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ५ हजार ९११ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ८९.०७ इतकी आहे. तर कला शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ६ हजार ९३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. तसेच ६ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ७० इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण २ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. शिवाय २ हजार २३५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
त्यापैकी १ हजार ९८० विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची टक्केवारी ८८.५९ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १ हजार २३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी १ हजार २३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले आहे. त्याची टक्केवारी ७९.०६ इतकी आहे.

सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के
वर्धा जिल्ह्यातील सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात वर्धा येथील सुशिल हिंमतसिंगका ज्यु. कॉलेज, सरस्वती विद्या मंदिर ज्यु. कॉलेज, देवळी तालुक्यातील पुलगाव नजीकच्या हिवरा येथील इंडियन मिलिटरी स्कूल, सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथील विद्याविकास ज्यु. कॉलेज, सेलू येथील दीपचंद चौधरी सायन्स ज्यु. कॉलेज, समुद्रपूर तालुक्यातील वासी येथील जे.डी. चौधरी कनिष्ठ महाविद्यालय, संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर यांचा समावेश आहे.

राधिकाला व्हायचंय सीए
बारावीच्या परीक्षेत ९६.४७ टक्के गुण संपादित करणाऱ्या साधिका तापडिया हिला उत्कृष्ट सीए व्हायचे आहे. ती दररोज खूप अभ्यास करीत नव्हती. मात्र, ती दररोज दोन तास अभ्यास करायची. शिवाय शाळा आणि शिकवणीला ती नियमित उपस्थिती दर्शवित होती. राधिका हिचे वडिल प्रशांत हे व्यावसायिक तर आई स्मीता या गृहिणी आहेत. उल्लेखनीय म्हणजे राधिका ही संयुक्त कुटुंबात राहत असून तिच्या कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकूंसह एकूण १२ सदस्य आहेत. बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाºया राधिका हिला चित्र रेखाटण्याचा छंद आहे. इतकेच नव्हे तर शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत नियमित चित्रकलेची शिकवणी लावते. तिने घेतलेल्या चित्रकलेल्या प्रशिक्षणामुळे ती सध्या उत्कृष्ट चित्रकारही झाली असल्याचे सांगण्यात आले.

विज्ञान शाखेतून ‘रोशनी’ चमकली
वर्धा जिल्ह्यातील विज्ञान, कला व वाणिज्य तसेच एमसीव्हीसी शाखेच्या एकूण महाविद्यालयांपैकी केवळ सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे असले तरी विज्ञान शाखेचा विचार केल्यास वर्धा शहरातील जे.बी. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या रोशनी मिश्रा हिने ९५.४४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर न्यू इंग्लिशच्या प्रणाली पखाले ९४.०० टक्के आणि सुमित तिवरे ९२.६२ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी राहिले.

Web Title: Radhika and Simran first in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.