जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू
By अभिनय खोपडे | Published: April 7, 2023 06:06 PM2023-04-07T18:06:52+5:302023-04-07T18:08:21+5:30
शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले
वर्धा : सेलू तालुक्यातील सोंडी गावानजीक असलेल्या शेतात वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला.दुपारी ३ वाजता वादळ आले त्यात विजांचा कडकडाट झाला शेतात वीज पडल्याने सुनील केशव कोडापे यांच्या मालकीचा असलेला बैल मृत्यू पावला अंदाजे २५ हजार रुपयाचा असलेला बैल मृत्य पावल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले.
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जनांसह सर्वदूर पाऊस झाला वाढत्या उकाड्यातून या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात काही भागात उभा असलेल्या गहू पिकाचे पावसामुळे नुकसान झाले तर भाजीपाला पिकालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक बाजार समितीमध्ये उघड्यावर असलेले धान्य झाकण्यासाठी तारांबळ उडाली.
दरम्यान, हवामान खात्याने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तविली आहे. यातच आज दुपारी झालेल्या पावसाने वातावरणात उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली. तर, पुढचे दोन दिवस म्हणजे ७ व ८ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस व गारपिटीचीही शक्यता आहे.