कासवगतीने भरून निघतेय जिल्ह्यातील पावसाची तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 05:00 AM2022-07-04T05:00:00+5:302022-07-04T05:00:01+5:30
आतापर्यंत केवळ ९७९.४३ मि.मी. पाऊस वर्धा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १९३९.१५ मि.मी. पाऊस झाला होता. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे. असे असले तरी आता कमी-अधिक प्रमाणात का होईना; पण जिल्ह्यातील आठही तालुक्यात पाऊस होत असल्याने कासवगतीनेच जिल्ह्यात पावसाची तूट भरून निघत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एरवी वर्धा जिल्ह्यात ३० सप्टेंबरअखेरपर्यंत सुमारे ६६७०.८४ मि.मी. पाऊस पडलो, पण यंदा आतापर्यंत केवळ ९७९.४३ मि.मी. पाऊस वर्धा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १९३९.१५ मि.मी. पाऊस झाला होता. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे. असे असले तरी आता कमी-अधिक प्रमाणात का होईना; पण जिल्ह्यातील आठही तालुक्यात पाऊस होत असल्याने कासवगतीनेच जिल्ह्यात पावसाची तूट भरून निघत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. मागील २४ तासात जिल्ह्यातील सात तालुक्यात १०९.२१ मि.मी. पाऊस झाला असून वर्धा १४.४० मि.मी., सेलू ६.४० मि.मी., देवळी १२.८५ मि.मी., हिंगणघाट २८.४५ मि.मी., समुद्रपूर ३५.१२ मि.मी., आर्वी ८.९३ मि.मी. तर आष्टी ३.०६ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत पडतो जिल्ह्यात ६६७०.८४ मि.मी. पाऊस
- जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सुमारे ६६७०.८४ मि.मी. पाऊस पडतो. एरवी सप्टेंबर अखेरपर्यंत वर्धा तालुक्यात ८२१.५२ मि.मी., सेलू ९१०.५० मि.मी., देवळी ८२८.३० मि.मी., हिंगणघाट ९३४.४७ मि.मी., समुद्रपूर ९२७.९० मि.मी., आर्वी ८३८.३५ मि.मी., आष्टी ७४२.५० मि.मी. तर कारंजा तालुक्यात ६६७.३० मि.मी. पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले.
मागील वर्षी कोसळला होता १९३९.१५ मि.मी. पाऊस
- जिल्ह्यात मागील वर्षी ३ जुलै या दिवसापर्यंत एकूण १९३९.१५ मि.मी. पाऊस पडला हाेता. मागील वर्षी ३ जुलैपर्यंत वर्धा तालुक्यात २०१.७८ मि.मी., सेलू २१३.६० मि.मी., देवळी ३५२.२२ मि.मी., हिंगणघाट २६८.६५ मि.मी., समुद्रपूर २१६.३८ मि.मी., आर्वी २५८.७२ मि.मी., आष्टी २२२.०८ मि.मी. तर कारंजा तालुक्यात २०५.७२ मि.मी. पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले.