सोयाबीन व कपाशीला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:05 AM2019-10-31T00:05:50+5:302019-10-31T00:08:47+5:30

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : ...

Rainfall returns to beans and cotton | सोयाबीन व कपाशीला परतीच्या पावसाचा फटका

सोयाबीन व कपाशीला परतीच्या पावसाचा फटका

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच

शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न घटणार : पाणबसन शेती राहिली पडीत, शासकीय यंत्रणा अद्यापही साखर झोपेतच
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : परतीच्या पावसाने जोर धरला नसला तरीही जेवढा बरसला तेवढ्यानेच सोयाबीन व उमललेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. आहे. कोरडवाहू शेतकºयाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी त्याची भिस्त आता कपाशी व तूर या पिकावर आहे. मात्र, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नावर होणार असून कर्जाचा डोंगर पुन्हा उभा ठाकणार आहे.
कपाशीची फळ धरण्याची कालमर्यादा आता संपत आली आहे. परंतु अद्यापही कपाशीला बोंडच आलेले नाही. शिवाय पाने पिवळी पडून लाल्या यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण होऊ लागल्याने हळूहळू पाने लाल पडून गळायला लागली. त्यामुळे बोंडे सुद्धा परिपक्व होत नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता बळावली आहे. खरीप हंगामात पावसाला उशीरा सुरूवात झाल्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारातच गेली. काहीचे सोयाबीन विकण्यासाठी नेले असता ओलाव्याचे कारण सांगून त्यांना कवडीमोल भाव देण्यात आला. गतवर्षी वर्धा तालुक्यात शासनाची खरेदी केंद्रे उघडलीच नाही. यावर्षी सुद्धा काही हालचाली दिसत नाही. शेतकºयांवर येणारी संकटे पाहून कृषी विभाग सुद्धा हतबल झाला आहे. सुरूवातीला तोंड वर काढणाºया बोंडअळीवर नियंत्रण असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. शितदही करून कापूस वेचणीला सुरूवात होणार एवढ्यातच आलेल्या पावसाने कापूस ओला झाला. आता तो वाळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.

पीक विम्याचा लाभ नाही.
पीक विम्याचे निकष मोठे क्लिष्ट असून भूस्सखलन,नाल्याच्या, नदीच्या पाण्यामुळे पीक खरवडून जाणे, वीज पडून नुकसान होणे किंवा महसूल मंडळात सलग ६५ मि.मी. च्या वर पाऊस पडल्यावरच शेतकरी भरपाईस पात्र ठरतो. किंवा पीक कापणीनंतर सलग १४ दिवस पाऊस पडल्यास नुकसानीस पात्र ठरविल्या जाते. यावरुन निकष तयार करणारे कुठला विचार करून निकष ठरवितात हे आता समजण्यापलीकडे आहे.

पाणबसन क्षेत्र पूर्णत: नष्ट
पाणी धरून ठेवणाºया जमिनीतील कपाशीची वाढ तर झालीच नाही. शिवाय सोयाबीन सुद्धा जागेवरच जिरले. अशा जमिनीतील खरीपाचे पीक काढून कोरडवाहू चना घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. अनुदानावर मिळणाºया महाबीजच्या सोयाबीनची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचलीच नाही. काही विक्रेत्यांकडे हे सोयाबीन अनुदानावर विक्रीला ठेवले जाते. तेही विशिष्ट लोकांनाच मिळते सर्व साधारण शेतकरी मात्र अनभिज्ञ असतो. त्याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे. कारण अनुदानावर मिळणारे बियाणे हे सर्वांसाठी खुले असायला पाहिजे. महाबिजच्यावतीने देण्यात येणाºया बियाण्यांवर कृषी विभागाचा कुठलाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागही अनुदानावर बियाणे उपलब्ध करतो. परंतु नेहमीप्रमाणेच हंगाम संपत आल्यावर वरातीमागून घोडे अशी परिस्थिती कृषी विभागाची झाली आहे.

Web Title: Rainfall returns to beans and cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती