पावसाचा दगा; शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:58 PM2017-08-23T23:58:03+5:302017-08-23T23:58:37+5:30

गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

Rains of rain; Farmers worried | पावसाचा दगा; शेतकरी चिंतातूर

पावसाचा दगा; शेतकरी चिंतातूर

Next
ठळक मुद्दे२५.५५ टक्के पाऊस कमी : यंदा केवळ ५२५.९४ मि.मी पाऊस पडला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्धा जिल्ह्यात २५.५५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. जिल्ह्यातील धरणे व नदी, नाले सध्या रिकामेच असून पावसाळा निघून जाण्याची परिस्थितीत असताना अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे संकट वाढण्याची दाट शक्यता आहे.
२३ आॅगस्ट पर्यंत गेल्या वर्षी वर्धा तालुक्यात ८४१.१० मि.मी., सेलू येथे ६८२.४०, देवळी ८५८, हिंगणघाट ९११, समुद्रपूर ६७२.६०, आर्वी ७३८.९०, आष्टी ७४०, कारंजा ६४०.५० मि.मी. पाऊस झाला होता. एकूण ६०८९.१० मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला होता. तो ७६१.१४ च्या सरासरीने होता. २३ आॅगस्ट पर्यंत ८२.८७ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ५७.१२ टक्केच पाऊस झाला आहे. वर्धा तालुक्यात ५१८.९०, सेलू ५७७.४०, देवळी ५२४.६०, हिंगणघाट ५६७.९१, समुद्रपूर ५४९.६०, आर्वी ५३५.०४, आष्टी ४०३.८०, कारंजा (घा.) तालुक्यात ५३०.३० मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत यंदा ५२५.९४ च्या सरासरीने ४२०७.५५ मि.मी. पाऊस झाला असून तो ५७.१२ टक्के आहे.
जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठा वाढलेला नाही. तसेच नदी, नालेही अद्याप कोरडेच आहे. त्यामुळे शेतीला भविष्यात पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे. गावातील जलस्तोत्र अद्यापही कोरडेच असून पिण्याच्या पाण्याचे संकट बिकट होईल.
भाजीपाला उत्पादकांनाही फटका
यंदा अत्यल्प पावसामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत आले आहेत. भाजीपाला पिकाला ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. कपाशी व सोयाबीन ला अशा स्वरूपात पाणी दिले जात आहे. सतत उष्णतामान वाढत असल्याने पीक जगविणे शेतकºयांसाठी अडचणीचे आहे.

Web Title: Rains of rain; Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.