२००५ नंतरच्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:17 AM2018-04-09T01:17:04+5:302018-04-09T01:17:04+5:30
पर्यावरण संवर्धन संस्था मागील गत चार वर्षांपासून घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंग व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी वॉर्डात सभा घेणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, पत्रक, जल साक्षरता रॅली या माध्यमातून शहरात जनजागृती व प्रत्यक्ष कार्य करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : पर्यावरण संवर्धन संस्था मागील गत चार वर्षांपासून घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंग व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी वॉर्डात सभा घेणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, पत्रक, जल साक्षरता रॅली या माध्यमातून शहरात जनजागृती व प्रत्यक्ष कार्य करीत आहे.
या विषयावर मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते यांच्याशी पर्यावरण संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून जल भरण उपक्रमाविषयी माहिती घेतली. गत तीन वर्षांपासून संस्था या विषयाचा पाठपुरावा करीत आली आहे. प्रत्यक्ष स्वरूपात कामही केले आहे. त्याच अनुषंगाने मागच्या दोन बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली होती. त्यावेळी २००५ नंतरच्या घर बांधकामांची यादी मागवली होती. त्यासंबंधी चर्चा झाली. ज्यामधे एकूण २,६३३ अशी घर आहेत ज्याचे बांधकाम २००५ नंतरचे आहे, अशी माहिती नगर पालिकेनी दिली. या संपूर्ण घरी रोन वॉटर हार्वेस्टिंग व चार झाड लावण्याचे काम लवकरात लवकर करावे अशा नोटीस घरामालकाला पाठवण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग व वृक्षरोपण बंधनकारक करणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील खुल्या जागांवर जलभरण व्हावे अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. यासाठी सध्या निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. जमिनीत पाणी जिरवने हे काम अत्यावश्यक आहे व याचा शहराला फायदा होईल असेही मुख्याधिकारी यावेळी म्हणाले. यावेळी संस्थेचे आशिष भोयर, प्रदीप गिरडे, अभिजित डाखोरे, छत्रपती भोयर, ज्ञानेश्वर चौधरी, हेमंत हिवरकर उपस्थित होते.