तुरीवरील निर्यातबंदी उठवा

By admin | Published: March 24, 2017 01:51 AM2017-03-24T01:51:36+5:302017-03-24T01:51:36+5:30

महाराष्ट्रात यंदा कडधान्य आणि त्यातही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कडधान्यावरील निर्यातबंदी सरकारने

Raise the export ban on pillow | तुरीवरील निर्यातबंदी उठवा

तुरीवरील निर्यातबंदी उठवा

Next

शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन
वर्धा : महाराष्ट्रात यंदा कडधान्य आणि त्यातही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कडधान्यावरील निर्यातबंदी सरकारने उठविण्याल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अशी मागणी निवेदनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेल्या निर्मला सितारामन यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा शेतकरी नेते राहुल ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या अ‍ॅडव्हान्स अंदाजानुसार देशात यंदा २२१ लाख टन कडधान्याचे उत्पादन झाले आहे. देशात पहिल्यांदाच विक्रमी उत्पादनाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात यंदा तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर तुरीचे उत्पादन ६८ टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन वाढल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही. खुल्या व्यापारात तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुक्सान सोसावे लागत आहे. तुरीवरील निर्यातबंदी उठविल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
देशातील कडधान्याच्या एकूण उत्पादनात ३० टक्के तूर आणि २५ टक्के चना एकट्या महाराष्ट्रात पिकला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती पाहता यंदा समाधानकारक उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कडधान्यावरील निर्यातबंदी हटवावी. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रूपयांचा नफा होईल. केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ठाकरे यांची आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Raise the export ban on pillow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.