रामदास तडस यांच्याकडून कोरोना उपाययोजनांसाठी पंतप्रधान निधीत एक कोटीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 07:02 PM2020-03-28T19:02:05+5:302020-03-28T20:45:19+5:30

वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी आपला एक महिन्याचा पगार रुपये एक कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदत निधीत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Ramdas Tadas receives Rs one lakh from Prime Minister's Fund for Corona measures | रामदास तडस यांच्याकडून कोरोना उपाययोजनांसाठी पंतप्रधान निधीत एक कोटीची मदत

रामदास तडस यांच्याकडून कोरोना उपाययोजनांसाठी पंतप्रधान निधीत एक कोटीची मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जगासह देशात कोरोना आजाराचा प्रकोप वाढत आहे. भारतात व राज्यातही रुग्णसंख्या वाढतीवर आहे कोरोणाच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी वर्धा लोकसभा क्षेत्राकरिता रुपये १ कोटी खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहेत. याबाबतचे पत्र खासदार रामदास तडस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला पाठविले असून  उपाययोजनांसाठी स्वीकार करण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.
दिल्ली येथे असलेल्या खासदार तडस यांच्या बँक खात्यातून सदर रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधी जमा होणार आहे

Web Title: Ramdas Tadas receives Rs one lakh from Prime Minister's Fund for Corona measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.