रान डुकरांनी केली कपाशीची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:29 PM2019-07-24T23:29:21+5:302019-07-24T23:30:01+5:30
दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिडी : दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर साधारण पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. त्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने पीकही अंकुरले. मात्र, सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच अंकुरलेले कपाशीच्या पीकचे रानडुकरांनी नासाडी केल्याने अल्पभूधारक शेतकºयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.
भिडी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश वटाणे यांनी यंदा सुरूवातीला कपासीची लागवण केली. पण, अल्प पावसामुळे सुरूवातीचे हे पीक हातचे गेले. शिवाय दुबार पेरणी करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसाच्या सरीमुळे पीक अंकुरले. पण रानडुकराच्या कळपाने शेतात घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. हा प्रकार उघडकीस येताच नुकसानग्रस्त शेतकºयाने फोन करून वनविभागाच्या कर्मचाºयाला माहिती दिली. परंतु, सदर अधिकाºयाने तुम्हीच तक्रार घेऊन पुलगाव येथे येण्याचा सल्ला दिल्याने शेतकºयाच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत नुकसानग्रस्त शेतकºयाला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.